घरात घुसून पावणेतीन लाखांचा ऐवज लुटला

शाहु हे आरोपींना त्यांनी केलेल्या कामाचा अ‍ॅक्सेस देत नसल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. शाहु यांना शिविगाळ व मारहाण केली. तसेच त्यांच्या घरातील फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीचे साहित्य, कॅमेरा, लेन्स, लॅपटॉप बॅग आणि इतर साहित्य असा २ लाख ८१ हजारांचा ऐवज लुटून नेला.

    पिंपरी: घरात घुसून शिविगाळ, मारहाण करत फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीचे साहित्य असा पावणेदोन लाखांचा ऐवज लुटून नेल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बाणेर येथे घडली. रंजना तिवारी, राकेश पारसी, विक्रम वैष्णव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सत्यब्रत सदानंद शाहु (वय २०, रा. तीर्थ टॉवर, बाणेर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
    आरोपी ५ मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास फिर्यादी शाहु यांच्या घरात शिरले. शाहु हे आरोपींना त्यांनी केलेल्या कामाचा अ‍ॅक्सेस देत नसल्याच्या कारणावरून आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. शाहु यांना शिविगाळ व मारहाण केली. तसेच त्यांच्या घरातील फोटोग्राफी, व्हिडिओग्राफीचे साहित्य, कॅमेरा, लेन्स, लॅपटॉप बॅग आणि इतर साहित्य असा २ लाख ८१ हजारांचा ऐवज लुटून नेला. सहायक पोलीस निरीक्षक यु. आर. खाडे तपास करत आहेत.