भोरमध्ये रविवारी वादळी पाऊस

भोर: गेले चार दिवस हवामानांत मोठा उकाडा जाणवत असतानाच रविवारी तालुक्याच्या बहूतेक भागांत वादळी पावसाने हजेरी लावली. मात्र विसगांव खोरे व हिर्डोशी खोऱ्यात सोसाटयाच्या वाऱ्यासह जोरदार पाउस व गारा पडल्या.

 अनेक भागांत गारा पिकांचे नुकसान

भोर: गेले चार दिवस हवामानांत मोठा उकाडा जाणवत असतानाच रविवारी तालुक्याच्या बहूतेक भागांत वादळी पावसाने हजेरी लावली. मात्र विसगांव खोरे व हिर्डोशी खोऱ्यात सोसाटयाच्या वाऱ्यासह जोरदार पाउस व गारा पडल्या. त्यामुळे जीवीतहानी झाली नसली तरी रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. कापणीस आलेला गहू,शेतात काढून ठेवलेला कांदा भिजला. जनावरांसाठी ठेवलेला चारा,भेळासुध्दा भिजला.वादळी वाऱ्यामुळे कांही घरांचे पत्रे उडाले, कौले फुटली, झाडे वाकली, उन्मळून पडली. हिर्डोशी व धामनदेव परीसरांत गारांचा सडा पडला. अचानक पाउस आल्याने शेतकऱ्यांंची तारांबळ उडाली. लॉकडाउनमुळे अनेक शेतकरीसुध्दा घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत.त्यामुळे त्यांना शेतातील धान्य,कांदा सुरक्षित ठीकाणी ठेवता आले नाही.