शिक्रापुरने घडविला इतिहास : ग्रामपंचायत बिनविराेध ; मागील निवडणूक हरलेल्या १७ जणांना संधी

शिक्रापूर : राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजत असताना अनेक शासनाने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत शिक्रापूरसारख्या सतरा सदस्य संख्या असलेल्या गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून मागील वर्षी हरलेल्या सर्वांना ग्रामपंचायत सदस्य करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे.

शिक्रापूर : राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजत असताना अनेक शासनाने ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. त्याला प्रतिसाद देत शिक्रापूरसारख्या सतरा सदस्य संख्या असलेल्या गावाने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून मागील वर्षी हरलेल्या सर्वांना ग्रामपंचायत सदस्य करून राज्यात आदर्श निर्माण केला आहे.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आर्थिक उलाढालीसाठी प्रसिद्ध असलेली शिक्रापूर ग्रामपंचायत मात्र गावातील सर्वच पक्षांच्या नेते मंडळींनी आपले वैयक्तिक हेवेदावे दूर ठेवून हा निर्णय घेतल्याने शिक्रापूर ग्रामस्थांनी संपूर्ण तालुका नव्हे तर जिह्यासाठी हा एकमुखी बिनविरोध निवडणुकीचा आदर्श निर्माण केला आहे. गावातील सर्वात जेष्ठ माजी सरपंच आबासाहेब करंजे, बापूसाहेब जकाते, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे, बाबासाहेब सासवडे, घोडगंगाचे माजी संचालक अरुण करंजे, माजी सरपंच रामभाऊ सासवडे, सोमनाथ भुजबळ, पोलिस पाटील मोहन विरोळे, पुणे बाजार समिती संचालक बाळासाहेब चव्हाण, रमेश थोरात, पंढरीनाथ राऊत, गावातील सर्व प्रमुख गावकारभारी ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात एकत्र आले होते.

गेल्यावेळी पैशाने गाजली िनवडणूक
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मागील सन २०१५ मध्ये एका मतासाठी तब्बल दहा हजारांच्या मतांच्या दराने निवडणूक गाजली होती. या िनवडणुकीत गावातील सर्व पुढाऱ्यांनी िनवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरामध्ये बैठक घेऊन तोडगा काढला. यावेळी मागील निवडणुकीत हरलेल्या सर्व सतरा उमेदवारांना ग्रामपंचायतीत सदस्यपदाची संधी देण्याचे ठरले.

परस्पर अर्ज ठेवल्यास सर्व एकवटणार
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरलेले सर्व उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीही पुन्हा हे सर्व गावकारभारी एकत्र येतील. सर्वच सहाही वाॅर्डात निवडणुकीत कुणी उभे राहणार नाही, याची दक्षता घेतील. तरीही कुणीही इच्छुकाने गाव हित डावलून परस्पर आपला अर्ज ठेवल्यास त्याच्या विरोधात सर्व गाव म्हणून निवडणूक लढविली जाईल, असेही यावेळी ठरले गेले.

 बैठकीतील अनपेक्षित निर्णयाने जल्लाेष
सरपंचपदाचे आरक्षण जसे पडेल तसे पुन्हा सर्व गावकारभारी एकत्र बसतील आणि सरपंच उपसरपंचांचा निर्णय घेण्याचेही यावेळी ठरले. शिक्रापूरात एकुण मतदान १४ हजार २२५ आहे. यातील ३० टक्के मुळ शिक्रापूरकर तर उर्वरित ७० टक्के बाहेरगावचे रहिवासी शिक्रापूरचे मतदार आहेत. बैठकीत अनपेक्षित निर्णय जाहिर झाला. अािण सर्वांनी एकच जल्लाेष केला.

भैरवनाथाच्या साक्षीला सर्व जागणार ?
शिक्रापूर येथे यापूर्वी एका ग्रामपंचायत सदस्याने उपसरपंचपदाच्या निवडणुकसाठी दुसऱ्या गटात जाऊन भैरवनाथ मंदिरामध्ये शपथ घेऊन पुन्हा गट बदलणार नसल्याची शपथ घेतली होती. मात्र नंतर लगेचच गट बदलला. त्यामुळे आता भैरवनाथाच्या साक्षीला सर्व जागणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.