चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

राजेंद्र जाधव महाबळेश्वर येथील रहिवासी आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने पत्नी बायना जाधव यांच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले होते. त्यात गंभीर जखमी झालेल्या बायना यांचा मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर महाबळेश्वर पोलिसांनी राजेंद्र जाधव यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पण, तो पसार होता.

    पुणे : महाबळेश्वरमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पसार झालेल्या पतीने पुण्यात गळफास लावून आत्महत्या केली. झाडाला त्याने गळफास लावून घेतला आहे. आंबेगाव टेकडीवर त्याने आत्महत्या केली आहेराजेंद्र उर्फ राजू महादेव जाधव (वय ५५) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र जाधव महाबळेश्वर येथील रहिवासी आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत त्याने पत्नी बायना जाधव यांच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले होते. त्यात गंभीर जखमी झालेल्या बायना यांचा मुंबईतील कस्तुरबा गांधी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला होता. त्यानंतर महाबळेश्वर पोलिसांनी राजेंद्र जाधव यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केला होता. पण, तो पसार होता.

    दरम्यान पुण्यातील आंबेगाव टेकडी परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या व्यक्तींना कुजलेल्या अवस्थेत एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी तपास सुरू केला. त्याच्या खिशात असलेल्या एका कागदावरून तो महाबळेश्वर येथील राजेंद्र महादेव जाधव असल्याचे उघड झाले. दरम्यान त्याच्या मृतदेहाचे श्वानांनी लचके तोडले असून मृतदेहाचे डोके गायब होते. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.