प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

विकसनासाठी जमीन घेऊन बांधल्या जाणा-या इमारतीमधील ठराविक भाग जमीन मालकाला देण्याचे ठरले. मात्र ठरलेला भाग न देता तो दुसऱ्याच व्यक्तीला विकला. दरम्यान सेवा विकास बँकेने बेकायदेशीरपणे 24 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले असल्याची फिर्याद जागा मालकाने पिंपरी पोलीस ठाण्यात दिली आहे. यानुसार बँकेचे चेअरमैन अमर मूलचंदानी सह 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी (Pimpari).  विकसनासाठी जमीन घेऊन बांधल्या जाणा-या इमारतीमधील ठराविक भाग जमीन मालकाला देण्याचे ठरले. मात्र ठरलेला भाग न देता तो दुसऱ्याच व्यक्तीला विकला. दरम्यान सेवा विकास बँकेने बेकायदेशीरपणे 24 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले असल्याची फिर्याद जागा मालकाने पिंपरी पोलीस ठाण्यात दिली आहे. यानुसार बँकेचे चेअरमैन अमर मूलचंदानी सह 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या पूर्वी 20 नोव्हेबंर रोजी हिंजवड़ी पोलिस ठाण्यात ही सेवा विकास बँकेचे चेअरमैन अमर मूलचंदानी सह 20 जणांवर सुमारे दीड कोटी रूपयांच्या फ़सवणुकीचा गुन्हा दाखल आहे. मे गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन आणि कॉन्ट्रॅक्टर प्रा लीचे संचालक अमित अशोक थोपडे (रा. भोसले नगर, पुणे), अशोक शिवनारायण थेपडे (रा. भोसले नगर, पुणे), दीपक अमृतलाल गुगळे (रा. भोसले नगर, पुणे), कुलमुखत्यार धारक लक्ष्मण ज्ञानोबा गुजर, दि सेवा विकास को ऑप बॅंक ली.चे चेअरमन अमर मुलचंदानी, संचालक अशोक मूलचंदानी, मनोहर मूलचंदानी, दया मूलचंदानी, दीपा मंगतानी, राजेश सावंत, चन्द्रशेखर अहिरराव, पंकज मसंद, नरेंद्र ब्राम्हणकर, धीरज भोजवानी, अमरजीतसिंग बासी, निखिल शर्मा, राजू तनवानी, रेखा कुकरेजा, नीलम सोनवानी, हेमा खटवानी, महेश रोहरा, प्रकाश पमनानी व अन्य एक अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत शिवाजीराव विठ्ठलराव सस्ते (वय 69, रा. औंध बाणेर शिव, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सस्ते यांनी त्यांची पाषाण येथील 350 चौरस मीटर जमीन मे गॅलक्सी कन्स्ट्रक्शन आणि कॉन्ट्रॅक्टर प्रा लीचे संचालक अमित, अशोक आणि दीपक यांना विकसन करण्यासाठी करारनामा करून दिली. त्याबदल्यात तयार होणा-या इमारतीच्या पहिल्या व दुस-या मजल्यावर मिळून साडेसहा हजार चौरस फूट चटई क्षेत्र देण्याचे ठरले. ठरलेल्या करारनाम्यातील अति व शर्तीनुसार मुदतीत बांधकाम पूर्ण केले नाही. पुणे महापालिकेकडून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला घेतला नाही. त्यामुळे आरोपींनी बांधकाम पूर्ण करण्यासाठी मुदत वाढवून घेतली. वाढवलेल्या मुदतीत देखील बांधकाम पूर्ण झाले नाही. त्यामुळे फिर्यादी सस्ते यांना वाढीव चटई क्षेत्र देण्याचे ठरले. तसा त्यांच्यात करारनामा देखील झाला.

त्यांनतर आरोपींनी आपसात संगनमत करून सस्ते यांना देण्याच्या पहिल्या व दुस-या मजल्यावरील चटई क्षेत्रावर दि सेवा विकास बँकेचे 24 कोटी रुपयांचे बेकायदेशीर कर्ज मंजूर केले. त्यातील 12 कोटींचे कर्ज मे गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन आणि कॉन्ट्रॅक्टर प्रा ली या कंपनीला पहिल्या, दुस-या व तिस-या मजल्यावर तर उर्वरित 12 कोटींचे कर्ज रुणेक्स इंटरनॅशनल या कंपनीला तळमजला व पोटमाळा यावर दिले. याबाबत गहाणखत तयार करण्यात आले. त्यात फिर्यादी सस्ते यांना दिलेल्या संपूर्ण पहिला व दुस-या मजल्यावर दि सेवा विकास बँकेचे बेकायदेशीर गहाणखत कर्ज केले असून तिसरा मजला अनधिकृतपणे बांधला आहे. अनधिकृतपणे बांधलेल्या मजल्यावर देखील दि सेवा विकास बँकेने गहाणखत करून कर्ज वितरित केले आहे.

करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार पहिल्या मजल्यावरील ऑफिस क्रमांक दोन व तीन हे मे मॅक्स टेक्नॉलॉजीसचे भागीदार निलेश प्रवीण जैन आणि प्रदीप अमृतलाल जैन यांना विकून सस्ते यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.