आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ४०४ वर

भिमाशंकर :  आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता रूग्ण संख्या ४०४ वर पोहोचली आहे. गेल्या चोविस तासांत ३९ रूग्ण आढळून आहेत. २६४ रूग्ण बरे झाले असून १३२  रूग्णांवर उपचार चालू आहे. तर उपचारादरम्यान आठ व्यक्तिंचा मृत्यु झाला असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालींदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितली.    

तालुक्यात गुरूवार (दि. ६ ) रोजी रात्री १६ रूग्ण आढळले यामध्ये मंचर ५ जण, चास व पिंपळगाव प्रत्येकी दोन, शिनोली, मेंगडेवाडी, निघोटवाडी, वडगावपीर, घोडेगाव, साल, खडकवाडी प्रत्येकी एक. तर शुक्रवार (दि.७) रोजी २३ जणांचा पॉझिटीव्ह रिपोर्ट आला, यात जवळे येथील ७ जण, शिनोली,

मंंचर व चास प्रत्येकी ३ जण, घोडेगाव व पेेठ प्रत्येकी २ जण, अवसरी, मेंगडेवाडी, धामणी प्रत्येकी एक असे एकूण या गावांत चोविस तासांत ३९ रूग्ण आढळून आले. यातील बहुतेक रूग्ण पहिल्या रूग्णांच्या संपर्कातील आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. तर अवसरी, भिमाशंकर आयुर्वेद मंचर, पिंपरी, तळेगाव, वडगाव मावळ, पुणे या हॉस्पिटमध्ये १३२ जणांवर उपचार चालू आहे.       

नागरिकांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. अन्यथा पोलीसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिला आहे.