कात्रजमध्ये रात्रीत दर्गा व दोन मंदिरांतील दान पेट्या चोरल्या; नागरिकांमध्ये तीव्र संताप

कात्रजमधील खोपडेनगर परिसरात गौसुल आझम शहिनशा दस्तगीर दर्गा आहे. दर्गा रात्री बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दर्ग्याच्या पाठिमागील बाजूच्या खिडकीतून आत प्रवेश केला. तसेच, एक स्टीलची दानपेटी, चार चांदिचे घोडे चोरले. त्यासोबतच दर्ग्याशेजारी असणाऱ्या शंकराच्या मंदिरात देखील चोरट्यांनी चोरी केली असून, या मंदिरात शिरून चोरट्यांनी दान पेटीतील अंदाजे १०० रुपये चोरले आहेत.

    पुणे : कात्रजमधील वाघजई देवी मंदिर, शंकराचे मंदिर तसेच या भागातील दर्ग्यातून चोरट्यांनी दान पेट्या चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. शहरात मंदिरांतून दान पेट्या चोरून नेण्याच्या प्रकार सतत घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. तर, दुसऱ्या बाजूला या घटना रोखण्यात पोलीसांना यश येत नसल्याचे दिसत आहे.

    याप्रकरणी साहिल खान (वय ३६, रा. न्यू पदमावती) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला असून, मंगळवारी सकाळी या घटना उघडकीस आल्या आहेत.

    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजमधील खोपडेनगर परिसरात गौसुल आझम शहिनशा दस्तगीर दर्गा आहे. दर्गा रात्री बंद असताना अज्ञात चोरट्यांनी दर्ग्याच्या पाठिमागील बाजूच्या खिडकीतून आत प्रवेश केला. तसेच, एक स्टीलची दानपेटी, चार चांदिचे घोडे चोरले. त्यासोबतच दर्ग्याशेजारी असणाऱ्या शंकराच्या मंदिरात देखील चोरट्यांनी चोरी केली असून, या मंदिरात शिरून चोरट्यांनी दान पेटीतील अंदाजे १०० रुपये चोरले आहेत. त्यानंतर चोरट्यांनी मोर्चा वाघजाई देवी मंदिरात वळवला. या मंदिरातून देखील चोरट्यांनी दोन दान पेट्या चोरून नेल्या आहेत. चोरट्यांनी गाभाऱ्या बाहेरील व आतील देखील दान पेटी चोरली आहे. एकूण या तीन घटनांमध्ये ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून, नागिरकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे. अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.