
पाबळ (ता.शिरुर) येथील आगरकर वस्ती येथील सावतामाळी मंदिरात असलेल्या भैरवनाथ देवाचा एक किलो वजनाचा चांदीचा मुखवटा चक्क होळीच्या दिवशीच चोरीला जाण्याची खळबळजनक घटना घडली.
शिक्रापूर : पाबळ (ता.शिरुर) येथील आगरकर वस्ती येथील सावतामाळी मंदिरात असलेल्या भैरवनाथ देवाचा एक किलो वजनाचा चांदीचा मुखवटा चक्क होळीच्या दिवशीच चोरीला जाण्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाबळ (ता.शिरुर) येथील आगरकर वस्ती येथे असलेल्या सावतामाळी मंदिरात भैरवनाथ देवाची देखील मूर्ती असून, त्या मूर्तीवर एक किलो वजनाच्या चांदीचा मुखवटा आहे. या मंदिरातील देवांची होळीच्या दिवशी पूजा करण्यासाठी पुजारी किरण आगरकर यांनी मंदिर उघडले होते. सायंकाळच्या सुमारास आगरकर शेजारी काही अंतरावर असलेल्या दुसऱ्या मंदिरात पूजा करण्यासाठी गेले. काही वेळाने आगरकर पुन्हा मंदिरात आले असता त्यांना मंदिरात देवाच्या मूर्तीवर असलेला एक किलो वजनाचा चांदीचा मुखवटा दिसला नाही.
त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना याबाबत माहिती देत पाहणी केली असता त्यांना कोठेच देवाचा मुखवटा मिळून आला नाही. त्यामुळे मंदिरातील देवाचा मुखवटा चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याबाबत किरण शांताराम आगरकर (वय ३० वर्षे रा. पाबळ ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिसल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हे दाखल केले.