In Pune, a married woman committed suicide by consuming 50 pills of thyroid disease after getting fed up with her husband's troubles.

घराचे व कारचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत पतीने विवाहितेचा छळ केला. पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने थायरॉईड आजाराच्या तब्बल 50 गोळ्या खाल्ल्या. हा प्रकार सप्टेंबर 2015 ते 2 डिसेंबर 2021 या आकालावधीत साने चौक, चिखली येथे घडला(In Pune, a married woman committed suicide by consuming 50 pills of thyroid disease after getting fed up with her husband's troubles.).

    पिंपरी : घराचे व कारचे कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत पतीने विवाहितेचा छळ केला. पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेने थायरॉईड आजाराच्या तब्बल 50 गोळ्या खाल्ल्या. हा प्रकार सप्टेंबर 2015 ते 2 डिसेंबर 2021 या आकालावधीत साने चौक, चिखली येथे घडला(In Pune, a married woman committed suicide by consuming 50 pills of thyroid disease after getting fed up with her husband’s troubles.).

    याप्रकरणी 31 वर्षीय विवाहितेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अमोल मारुती भंडारे (वय 37, रा. साने चौक, चिखली) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती अमोल याने घराचे आणि कारचे कर्ज फेडण्यासाठी विवाहितेकडे त्यांच्या आई वडिलांकडून वेळोवेळी पैसे आणण्याची मागणी केली. मागणीनुसार पैसे दिले नाहीत म्हणून पतीने माहेरच्या लोकांवरून टोमणे मारून मारहाण व शिवीगाळ केली. रात्री अपरात्री दारू पिऊन येऊन पती फिर्यादीला मारहाण करत असे. तसेच पतीने फिर्यादी विवाहितेला उपाशी ठेवले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

    या त्रासाला कंटाळून गुरुवारी (दि. 2) विवाहितेने थायरॉईड आजारावरील 50 गोळ्या खाल्ल्या असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.