पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अनंत चतुर्दशी रहाणार ‘या’ गोष्टी बंद ; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मोठा निर्णय

करोनाचे संकट अजूनही टळलेले नसून खबरदारीचा उपाय म्हणून अनंत चतुर्दशीला शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री पवार यांच्या बैठकीत घेण्यात आला.

    पुणे: कोरोनामुळे यंदाही गणेशोत्सवही अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. अशातच अनंत चतुर्दशीला (रविवार) पुणे, पिंपरी – चिंचवड शहरातील सर्व दुकाने बंद राहणार आहेत. हॉटेल आणि रेस्टॉरंट दिवसभर सुरु राहतील, तसेच औषधांची दुकाने आणि रूग्णालये सुरु राहतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या करोना आढावा बैठकीत दिली आहे.

    करोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. करोनाचे संकट अजूनही टळलेले नसून खबरदारीचा उपाय म्हणून अनंत चतुर्दशीला शहरातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री पवार यांच्या बैठकीत घेण्यात आला.

    पुणे आणि महाराष्ट्र पातळीवर साडेसहा महिने दोन्ही कोरोना लाट टिकल्या होत्या. त्याचा अभ्यास करून तिसऱ्या लाटेसंदर्भात तयारी सुरु आहे. पुण्यातला साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि मृत्यू दर कमी झाला आहे. मात्र जिल्ह्याचा रेट ०.०७ आहे. हा वाढीचा दर असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे.

    अजित पवार