बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन

    बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : बारामती शहरातील शासकीय वैद्यकीय महविद्यालय येथे केंद्र व राज्य शासन पुरस्कृत ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक केशव घोडके, अभ्यागत समितीचे सदस्य, प्राध्यापक, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, सिल्व्हर ज्युबली रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे, तसेच पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.

    या प्रकल्पाची क्षमता एक हजार लिटर्स प्रति मिनिट असून, वातावरणातून हवा घेऊन ऑक्सिजन निर्मिती केली जाते. यावेळी आजिंक्य बिग बजार, बारामती यांच्यातर्फे कोठरी मशिन, मायक्रोव्हेव व कमर्शियल कॉफी मशिन वैद्यकीय महाविद्यालयास भेट म्हणून उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी अजिक्य गांधी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

    बैठकीपूर्वी रत्ना निधी चॅरिटेबल ट्रस्ट व एसबीआय कॅपिटल फायनान्स तर्फे देण्यात आलेल्या ४१ ऑक्सिजन कॉन्सट्रेटरचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. हे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर ग्रामीण रुग्णालय बारामतीसाठी देण्यात आले.