ॲट्रॉसिटीची धमकी देऊन ब्लॅकमेल करणाऱा पत्रकार पोलिसांच्या जाळ्यात ; खंडणी स्वीकारणाऱ्या इतर दोघांवर गुन्हा दाखल

पंढरपूर : शहरातील श्रीराम हॉटेल येथे दिनांक १८ रोजी पत्रकार असल्याचे सांगून, खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन, दहा हजार रुपये खंडणी उकळणाऱ्या तानाजी कांबळे रा. लक्ष्मी टाकळी व पांडुरंग शेळके या दोघांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.

याप्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत आवटे रा, लक्ष्मी टाकळी ता.पंढरपूर यांना, माझ्या पत्नीवर बलात्कार केल्याची फिर्याद देतो, तसेच मोबाईल चोरीचा गुन्हा तुझ्यावर दाखल करतो, असे सांगून ॲट्रॉसिटीची धमकी देत, दहा हजार रुपयाची खंडणी मागणाऱ्या, तानाजी कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मी टाकळी व पत्रकार असल्याचे सांगणाऱ्या त्याच्या सोबत त्याचे मित्र पांडुरंग शेळके व ज्योतीराम कांबळे यांना खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात पकडले. यातील पांडुरंग शेळके घटनास्थळावरून फरार झाला आहे. तथाकथीत पत्रकार तानाजी कांबळे याने दहा हजार रुपये देण्यासाठी मागणी करून यातील तीन हजार रुपये व जेवणाचे बिल स्वीकारलेहोते. उर्वरित सात हजार रुपये घेण्यासाठी त्याने फिर्यादीस हॉटेल श्रीराम येथे बोलावले होते. मात्र पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपी यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी शहर पोलीस ठाण्यात भादवी ३८४,३८५, ३८८, ३८९, ३४अनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोसई हमीद शेख, हेकॉ सुरेश माळी करीत आहेत.