चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी  मिलिंद एकबोटे यांच्यासह अकोल्याचे कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल

गेल्या आठवड्यात (दि १९) रविवारी नातूबाग मैदानात संघटनेकडून शिव प्रतापदिन अर्थात अफझलखान वधाचा आनंदोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात भाषणे करण्यात आली. त्यात दोन समाजाच्या भावना दुःखतील तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भडकाऊ आणि चितावणीखोर भाषणे केली.

    पुणे : दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भडकाऊ आणि चितावणीखोर भाषण केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील नातूबाग मैदानात झालेल्या कार्यक्रमात भाषण केले आहे. त्यामुळे चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

    याप्रकरणी पोलीस अंमलदार सोमनाथ ढगे यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे, मोहनराव शेटे, दीपक नागपुरे, कालीचरण महाराज, नंदकिशोर एकबोटे आणि दिगेंद्रकुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात (दि १९) रविवारी नातूबाग मैदानात संघटनेकडून शिव प्रतापदिन अर्थात अफझलखान वधाचा आनंदोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात भाषणे करण्यात आली. त्यात दोन समाजाच्या भावना दुःखतील तसेच दोन समाजात तेढ निर्माण होईल असे भडकाऊ आणि चितावणीखोर भाषणे केली. तसेच धार्मिक श्रद्धाचा अपमान केला आणि येथे जमलेल्या लोकांना भकावण्याचा प्रयत्न केला असल्याचे तक्रारीत म्हंटले आहे.

    दरम्यान पोलिसांकडे तक्रार आणि या भाषणाची क्लिप देण्यात आली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता यावरून वाद होण्याची शक्यता आहे.