कांचन कुल यांची पुणे जिल्हा भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्षपदी निवड

भारतीय जनता पार्टी दौंड तालुका अध्यक्षपदी ज्ञानदेव (माऊली) ताकवणे यांची निवड !

पारगाव : भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा नवीन कार्यकारिणी तयार करण्या संदर्भात पुणे येथे कार्यक्रमाचे आज(ता.१७) रोजी आयोजन करण्यात आले होते.दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या पत्नी व बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजपाच्या उमेदवार कांचन कुल यांना पुणे जिल्हा महिला मोर्चाचे अध्यक्ष पद बहाल करण्यात आले आहे.तसेच यावेळी जिल्हा पदाधिकारी निवड,जिल्हा मोर्चा पदाधिकारी,पुणे जिल्हा ग्रामीण आघाड्या व पदाधिकारी,मीडिया विभाग/सोशल मीडिया आणि कार्यालय मंत्री असे विभाग नुसार पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली.

दौंड तालुका अध्यक्षपदी ज्ञानदेव (माऊली) ताकवणे,किसान मोर्चा सरचिटणीस ज्ञानेश्वर(माऊली) शेळके(दौंड),पुणे जिल्हा ग्रामीण उद्योग सह संयोजक धीरज भळगट(दौंड),दौंड शहर व्यापार संयोजक स्वप्नील शहा,ग्रामविकास सह संयोजक गणेश आखाडे(दौंड) या पदाधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. 

भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा नविन पदाधिकारी  निवड प्रमुख उपस्थितांमध्ये पार पडला यावेळी खासदार गिरीष बापट,माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे ,आमदार राहूलदादा कुल,आमदार भिमराव तापकिर,पश्चिम महाराष्ट्र चे संघटन मंत्री रवि आनासपुरे , माजी जि.प.अध्यक्ष जालिंदर कामठे आदी मान्यवर यावेळी उपस्थित  होते.

 

भारतीय जनता पार्टी दौंड तालुकाध्यक्ष  म्हणून काम करत आसताना  संघटन चांगल्या प्रकारे  करून मोठी जबाबदारी या नात्याने पार पाडली.लोकसभेची उमेदरवारी आपल्या दौंड तालुक्यात मिळाली.१९७६ नंतर भाजपाचे आमदार निवडून आले हेच काम उत्तम  आहे व भाजपाचे विचार घरा-घरात पोहचवण्यासाठी  पुर्ण वेळ काम केले व भविष्यात करेल.

 – गणेश आखाडे (मा. तालुकाध्यक्ष भाजपा,दौंड)