किरण गोसावीला अटक; उद्या करणार न्यायालयात हजर

न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या किरण गोसीवाला पुणे पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात अटक केली आहे. त्याच्यावर पुण्यात एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्याला गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर एक रात्र किरण गोसावीने येरवडा कारागृहात काढली.

    पुणे : न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्या किरण गोसीवाला पुणे पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात अटक (Kiran Gosavi Arrested) केली आहे. त्याच्यावर पुण्यात एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. त्याला गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर एक रात्र किरण गोसावीने येरवडा कारागृहात काढली.

    किरण प्रकाश गोसावी (वय ३७, रा. वाशी, नवी मुंबई) याला लष्कर पोलीसांनी बुधवारी अटक केली. त्याच्यावर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत एका 33 वर्षीय तरूणाने तक्रार दिली आहे.

    पुण्यातील चिन्मय श्रीधर देशमुख (वय २२) या तरूणाची नोकरी लावण्याच्या अमिषाने ३ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात किरण गोसीवावर २०१८ साली गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अडीच वर्षे तपास करून पोलीसांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. तर, त्याला फरार घोषित केले होते. परंतु, क्रुझवर एनसीबीने कारवाई केल्यानंतर अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसोबत सेल्फी काढली होती. त्यानंतर तो चर्चेत आला. पुणे पोलिसांनी फरार घोषित केलेल्या किरण गोसीवाला नाट्यमयरित्या अटक केली.

    दरम्यान, किरण गोसीवाला अटक केल्यानंतर त्याच्यावर पुण्यातील लष्कर व वानवडी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले. त्यात लष्कर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार तरूणासह तिघांकडून 4 लाख 5 हजार रुपये घेऊन त्याने फसवणूक केली होती. याप्रकरणात आता किरण गोसीवाला लष्कर पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे.

    फरासखाना पोलीसांची पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर या गुन्ह्यात त्याला अटक केली. गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले.