Let's overcome corona and build health; Happy New Year to Chief Minister Uddhav Thackeray

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनात ढोल- ताशे वाजवले जात असताना पोलीस त्या ठिकाणी पोहचले आणि मिरवणूकीचं साहित्य जप्त केलं. त्यानंतर त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.

    पुणे: आज सर्वत्र गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात गणपती बाप्पाचं विसर्जन गणेशभक्त करत आहेत. अशातच पुण्यातील मानाचा चौथा गणपती असणाऱ्या तुळशीबाग गणपतीच्या विसर्जना दरम्यान भक्तांनी नियमांचे उल्लंघन करत ढोल-ताशा वादन सुरू केल्याने पोलीस आणि कार्यकर्ते यांच्या शाब्दिक चकमक घडली. या दरम्यान असताना पोलिसांनी त्यांच्याजवळील वादन साहित्य काढून घेतलं, या घटनेवरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

    ‘मुख्यमंत्र्यांनी राज्यात शरिया राजवट जारी करणे बाकी ठेवले आहे. पुणे पोलिसांनी मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक थांबवून ढोल-ताशे जप्त केलं आहेत. त्यामुळे खंडणी सरकाच्या या दडपशाहीचा हिशोब चूकता केल्याशिवाय जनता राहणार नाही,’ असं म्हणत भातखळकरांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

    आज सकाळी कसबा गणपतीसह मानाच्या इतर चारही गणपतीचं विसर्जन केलं जाणार होतं. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनात ढोल- ताशे वाजवले जात असताना पोलीस त्या ठिकाणी पोहचले आणि मिरवणूकीचं साहित्य जप्त केलं. त्यानंतर त्या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.दरम्यान, मंडळाचे खजिनदार नितीन पंडीत यांनी सांगितलं की, पोलिसांनी आमच्यावर कारवाई केली नसून फक्त समज दिला आहे. त्यानंतर तुळशीबाग मंडळाची मिरवणूक शांततेत पार पाडली आणि गणपतीचं विसर्जन करण्यात आलं.