कवठे येमाईत बिबट्याचा थरार, अखेर रात्री बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

कवठे येमाई : शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई - शिक्रापुर रस्त्यालगत असलेल्या ढाकी वस्तीवर गेल्या अनेक दिवसांपासुन बिबट्याची मोठीच दहशत पसरली होती. दरम्यान रात्री ९ च्या सुमारास घराजवळ बांधलेल्या एका घोडीवर बिबट्याने हल्ला करीत तिला ठार केले. परिसरातील नागरिकांनी व वन विभागाच्या कर्मचाऱयांनी वेळीच त्या ठिकाणी पिंजरा लावल्याने भुकेलेला हा बिबट्या रात्री १ च्या सुमारास अलगद पिंजर्यात जेरबंद झाला.

 कवठे येमाई :  शिरूरच्या पश्चिमेकडील कवठे येमाई – शिक्रापुर रस्त्यालगत असलेल्या ढाकी वस्तीवर गेल्या अनेक दिवसांपासुन बिबट्याची मोठीच दहशत पसरली होती. दरम्यान रात्री ९ च्या सुमारास घराजवळ बांधलेल्या एका घोडीवर बिबट्याने हल्ला करीत तिला ठार केले. परिसरातील नागरिकांनी व वन विभागाच्या कर्मचाऱयांनी वेळीच त्या ठिकाणी पिंजरा लावल्याने भुकेलेला हा बिबट्या रात्री १ च्या सुमारास अलगद पिंजर्यात जेरबंद झाला. 

       कवठे येमाईच्या ढाकी वस्तीवरील बहुतांश शेतकरी शेतातच घर बांधुन वास्तव्यास आहेत.सोमवार दि.११ रोजी सायंकाळी ९ च्या दरम्यान दगडु वामन सांडभोर यांच्या घराजवळ शेतात बांधलेल्या घोडीवर हल्ला चढवत बिबटयाने घोडी ठार केली.घोडीच्या नरडीचे रक्त प्राशन करुन बिबट्या पसार झाला.तर लगेचच घडलेला हा सर्व प्रकार परिसरातील तरुणांच्या लक्षात आल्यानंतर वस्तीवरील तरुणांनी मा.ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सांडभोर यांचेशी संपर्क साधला त्यांनी तात्काळ वन विभागाशी संपर्क करुन रात्री ११ वाजता सविंदणे येथे स्वतः जाऊन बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा आणला. वस्तीवरील तरुणांच्या मदतीने त्यानी त्यांचे शेतामधे बिबटयाला पकडण्यासाठी पिंजरा लावला. भक्ष म्हणून पिंजऱ्यात  मृत घोडी ठेवण्यात आली. थोडया वेळातच पिजऱ्याचा दरवाजा लागल्याचा आवाज आल्याने दत्तात्रय सांडभोर यांचे घराजवळ थांबलेल्या तरुणांनी बिबट्या पिंजऱ्यामधे जेरबंद झालेची खात्री केली.  मध्यरात्री १ च्या सुमारास अखेर बिबटयाला पकडण्यामधे तरुणांना यश आले. रात्रीच तात्काळ दत्तात्रय सांडभोर यांनी वन विभागाशी संपर्क साधत त्यांना बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची खबर वन विभागाला दिली. शिरूर येथून वन विभागाचे कर्मचारी कवठे येमाई येथे रात्री २:३० च्या दरम्यान दाखल झाले व बिबटयासह पिंजरा घेऊन गेले. 
तर परिसरात सातत्याने दर्शन देत दहशत माजविणारा बिबट्या पिंजर्यात जेबाद झाल्याने शेतकऱयांनी समाधान व्यक्त केले. ऐवढया रात्री धाडस दाखवत दत्तात्रय सांडभोर यांनी ढाकी वस्तीवरील निवडक तरुणांच्या मदतीने बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यश मिळविल्याने  दत्तत्रय सांडभोर व त्यांना मदत करणाऱ्या तरुणांचे अभिनंदन होत आहे.