serial rapist taxi driver punishment for 384 years

घटनेच्या दिवशी सोनाली दिवसभर बेपत्ता होती. तिच्या पतीने दिवसभर शोध घेतल्यानंतर रात्रीच्या वेळी देहूरोड पोलिसांत धाव घेतली आणि सोनालीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली.

    पिंपरी चिंचवड: पुण्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने घडत आहेत. मागील काही दिवसांपूर्वीचा चुलत दिराने वाहिनीचा खून केल्याची घटना समोर आली होती. त्यामध्ये धक्कादायक माहिती पोलिसांच्या समोर आली आहे. घटनेतील आरोपी असलेल्या दिराने आपल्या मित्राच्या मदतीने वहिनीवर बलात्कार  (Rape) केला व त्यानंतर ओढणीने गळा आवळत दगडाने ठेचून त्याचा खून केला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी सोनाली दिवसभर बेपत्ता होती. तिच्या पतीने दिवसभर शोध घेतल्यानंतर रात्रीच्या वेळी देहूरोड पोलिसांत धाव घेतली आणि सोनालीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली.

    तर दुसरीकडे आरोपी तुकारामला मित्राने फोन केला की, ”आपल्याला पुण्यातील बुधवार पेठमध्ये जाऊन मजा करायची आहे त्यावर तुकाराम म्हणाला मी सर्व सोय केलेली आहे तू इथे ये, जी मज्जा पुण्यात मिळते ती इथे घेऊ” .

    त्यानंतर आरोपीने सोनालीला आपण ‘घर बघायला जाऊ’ असे सांगून पांडव कालीन घोरवडेश्वर डोंगरावर नेले. तिथे आधीच हजर असलेल्या मित्राने अगोदर अत्याचार केला, त्यानंतर चुलत दिराने ही वाहिनीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची कबुली दिली आहे.

    तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगांव पोलीस मित्र आरोपीचा शोध घेत आहे. दरम्यान, दुर्दैवी सोनालीच्या नातेवाईकांनी तळेगांव दाभाडे पोलीस स्टेशनच्या आवारात टाहो फोडला. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, दोन्ही आरोपींची केस फास्ट ट्रक कोर्टात चालवून या नराधमांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी मृत महिलेल्या नातेवाईकांनी केली.