पुणे शहरात पावसाच्या हलक्या सरी ; पुढील चार दिवस पावसाच्या मुक्कामाची शक्यता

पुण्यातून थंडी जवळपास गायब झाली असून, आज पावसाने हजेरी लावल्याने विचित्र हवामान अनुभवास येत आहे. शहराच्या अनेक भागात पाऊस झाल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. त्यामुळे वाहतूकोेंडीही झाली.

    पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरातील वातावरण पावसाळी झाले होते. मात्र रविवारी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली  आणि  हवेत गारवा निर्माण झाला. शहराच्या विविध भागात हलक्या सरी पडल्या. दरम्यान आणखी चार दिवस (दि़ २५) शहरात पाऊस पडण्याची तर, उद्या (दि. २२) मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, शहरातून नोव्हेंबरमधील थंडी गेल्या आठ दिवसांपासून गायब झाली असून सध्या उकाडा आिण पाऊस अशा विचित्र हवामानाचा अनुभव पुणेकर घेत आहेत.

    पूर्व मध्य अरबीसमुद्र ते महाराष्ट्र किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. तमिळनाडूसह कर्नाटक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्यातही मराठवाडा, विदर्भ आिण मध्य महाराष््टात पावसाळी वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पुण्यासह अनेक शहरांचे कमाल तापमान ३० अंशावर तर,  िकमान तापमान २२ अंशावर नोंदले गेले आहे. हवेत एकप्रकारची आर्द्दता अनुभवास येत आहे. गेल्या २४ तासांत कोकण गोव्यात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

    पुण्यातून थंडी जवळपास गायब झाली असून, आज पावसाने हजेरी लावल्याने विचित्र हवामान अनुभवास येत आहे. शहराच्या अनेक भागात पाऊस झाल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. त्यामुळे वाहतूकोेंडीही झाली.