मचाडालो स्टार्टअपचा हेल्प डेस्क : वॉटसप चँटबोटच्या माध्यमातून कोविड-१९ बाबतच्या नागरीकांच्या प्रश्नांची सहज माहिती उपलब्ध!

नागरीकांनी उपलब्ध चँटबोट क्रमांकावर संदेश टाकला की मेनू मध्ये कोणत्या शहरात नेमकी काय सेवा उपलब्ध केली जात आहे याची माहिती मिळते. त्यामध्ये कोविड-१९ शी संबधित सेवा सुविधांबाबतच्या प्रश्नांना देखील उत्तरे दिली जात आहेत. जसे की कोणत्या शहरात किती बेडस कोणत्या रूग्णालयात उपलब्ध आहेत, डॉक्टरची सेवा कोणत्या ठिकाणी मिळू शकेल

    पुणे :  वॉटसप चँटबोटच्या माध्यमातून कोविड-१९ बाबतच्या नागरीकांच्या प्रश्नांची उत्तरे देणा-या कोविड हेल्पडेस्कची निर्मिती ७२०८८८०२०८ या क्रमांकावर सुरू करण्यात आली आहे. वॉटसप संदेश देवून या क्रमांकावर नागरीकांना कोविड-१९ शी संबंधित माहिती जसे की प्राणवायू, औषधे, रूग्णसेवा डॉक्टर इत्यादी सहजपणे याव्दारे उपलब्ध होणार आहे. मुंबईतील मचाडालो या स्टार्टअपने हा हेल्प डेस्क सुरू कैला आहे. देशातील ७४२ जिल्ह्यांपैकी ५४० जिल्हयात या डेस्कची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे.

    सेवा सुविधांबाबतच्या प्रश्नांना उत्तरे
    नागरीकांनी उपलब्ध चँटबोट क्रमांकावर संदेश टाकला की मेनू मध्ये कोणत्या शहरात नेमकी काय सेवा उपलब्ध केली जात आहे याची माहिती मिळते. त्यामध्ये कोविड-१९ शी संबधित सेवा सुविधांबाबतच्या प्रश्नांना देखील उत्तरे दिली जात आहेत. जसे की कोणत्या शहरात किती बेडस कोणत्या रूग्णालयात उपलब्ध आहेत, डॉक्टरची सेवा कोणत्या ठिकाणी मिळू शकेल.इत्यादी. एप्रिल-२० मध्ये सुरू करण्यात आलेल्या या सेवेचा दुस-या लाटेच्या काळात दररोज सुमारे पाचशे ते सातशे लोकांनी लाभ घेतला आहे. देशातील तिस-या आणि चौथ्या दर्जाच्या शहरासंह प्रमुख शहरात उपलब्ध सुविधांची तातडीने माहिती या सेवेतून नागरीकांना सहजपणे घेता येत आहे.

    कोविड-१९ नंतरच्या मदत आणि पुनर्वसनाचे काम
    याकरीता ४५० डॉक्टर्स आणि तीनशे स्वयंसेवक रात्रंदिसव कार्यरत असून चँटबोटच्या माध्यमातून चोविस तास ऑक्सिजन बेडसह अनेक सुविधांची माहिती दिली जात आहे. सध्या या चँटबोटच्या माध्यमातून कोविड-१९ नंतरच्या मदत आणि पुनर्वसनाचे काम सुरू करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबविण्यासाठी त्याचा उपयोग होत आहे. तिस्-या लाटेचा संभाव्य धोका पाहता अश्या प्रकारे रूग्णांना तातडीने माहिती देणा-या सेवचे महत्वाचे स्थान आहे.