महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीकडून खडकी आणि आकुर्डीत परिसरातील झाडे ‘करणी’ मुक्त

धश्रध्देला कोणी बळी पडू नये यासाठी काळया बाहुल्यांमधून झाडांना मुक्त करण्यात आले. अंनिस पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव या गोष्टीचा पाठपुरावा करीत असून याबाबत खडकी पोलीस स्टेशनला तक्रार अर्जही देण्यात आलेला आहे. झाडांना ठोकलेल्या काळया बाहुल्या काढून जाळण्यात आल्या आहेत.

    पिंपरी: महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती (अंनिस) पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे आकुर्डी ,बजाज ऑटो पुलाजवळील आणि खडकी येथील होळकर पुलाखालील म्हसोबा मंदिराच्या आवारात असणाऱ्या झाडांना माणसांच्या नावाने करणी करण्यासाठी लावलेल्या काळया बाहुल्या, बिबवे,फोटो,लिंबू , चिठ्ठ्या, दाभण आदी हटविण्यात आले.
    अंधश्रध्देला कोणी बळी पडू नये यासाठी काळया बाहुल्यांमधून झाडांना मुक्त करण्यात आले. अंनिस पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव या गोष्टीचा पाठपुरावा करीत असून याबाबत खडकी पोलीस स्टेशनला तक्रार अर्जही देण्यात आलेला आहे. झाडांना ठोकलेल्या काळया बाहुल्या काढून जाळण्यात आल्या आहेत.जादूटोणा विरोधी कायदा असूनही प्रभावी अंमलबजावणी केली जात नाही, हे दोन्ही प्रकार थांबविण्यासाठी खडकी आणि निगडी पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद व्हावा यासाठी ‘अंनिस’ कडून निवेदन देण्यात आले आहे.
    अंनिसकडून करणी रोखणाऱ्या बाबा आणि मांत्रिकांना २१ लाख रुपयांचे बक्षिसाचे आव्हान केले आहे.या मोहिमेत अंनिसचे महासचिव मिलिंद देशमुख, उपाध्यक्ष श्रीराम नलावडे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, पिंपरी-चिंचवड शाखा कार्याध्यक्ष विजय सुर्वे, निगडी शाखा अध्यक्ष प्रदीप तासगावकर, बुवाबाजी विभागाचे भगवान काळभोर उपस्थित होते.