वडगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांवर ‘महाविकासआघाडी’चे उमेदवार विजयी

भाजपाला धक्का; एकही सभापतीपद नाही

वडगाव मावळ : वडगाव मावळ नगर पंचायतीच्या विषय समितीच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत सर्वच्या सर्व विषय समिती सभापतीपदी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले तर भाजपाला एकही सभापतीपद न मिळाल्याने धक्का बसला.

निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार मधुसुदन बर्गे व सहाय्यक निवडणुक अधिकारी मुख्याधिकारी सुवर्णा ओगले व नगराध्यक्ष मयुर ढोरे व उपनगराध्यक्ष चद्रजित वाघमारे यांच्या उपस्थितीत झालेल्या निवडणुकीत सहापैकी तीन विषय समितीच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या.तर तीन विषय समितीच्या निवडणुकीसाठी मतदान झाले.

स्वच्छता वैधक व आरोग्य समिती सभापतीच्या निवडणुकीत माया अमर चव्हाण यांनी भाजपाचे प्रविण चव्हाण यांचा १ मताने पराभव केला, तर नियोजन व विकास समिती सभापतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजेंद्र कुडे यांनी भाजपाचे किरण म्हाळसकर यांचा १ मताने पराभव केला. शिक्षण व क्रिडा सभापतीच्या निवडणुकीत नगरसेवक राहुल ढोरे यांनी भाजपचे दशरथ खेगंले यांचा १ मताने पराभव केला.आघाडीला तीन तर भाजपला प्रत्येकी दोन मते मिळाली.संख्याबळ निशित झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. निवडीनतंर आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.

स्थायी समिती:सभापतीपदी मयूर ढोरे
सदस्य-चद्रंजित वाघमारे,राजेंद्र कुडे, माया चव्हाण, पुजा वहिले राहुल खैरे, पुनम जाधव

१)बांधकाम समिती:सभापतीपदी पुजा वहिले . सदस्य- सायली म्हाळसकर , प्रमिला बाफणा.अर्चना म्हाळसकर, सुनिता भिलारे

२) शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिक कार्य समिती : सभापतीपदी राहुल ढोरे सदस्य-सायली म्हाळसकर, शारदा ढोरे दिलीप म्हाळसकर, दशरथ खेंगले

३) पाणी पुरवठा व जल नि:स्सारण समिती : सभापतीपदी चद्रजित वाघमारे,* सदस्य- शारदा ढोरे, दिनेश ढोरे, दिपाली मोरे प्रमिला बाफना

४)नियोजन व विकास समिती:सभापतीपदी राजेंद्र कुडे सदस्य-प्रमिला बाफना किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे , सायली म्हाळसकर

५) स्वच्छता वैधक व आरोग्य समिती:सभापतीपदी माया चव्हाण सदस्य –प्रविण चव्हाण , प्रमिला बाफणा,अर्चना म्हाळसकर, शारदा ढोरे

६) महिला व बालकल्याण समिती :सभापतीपदी पुनम जाधव,-सदस्य-दिपाली मोरे,प्रमिला बाफणा,सायली म्हाळसकर,अर्चना म्हाळसकर