एकतर्फी प्रेमातून मजनूचा तरुणीच्या घरासमोर धिंगाणा; उचलून घेऊन जाण्याची धमकी

३८ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार राहुल धुमाळ (वय २५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यमुनानगर भागात दोन दिवसांपूर्वी (दि. २५ सप्टेंबर) रात्री हा प्रकार घडला आहे.

    पुणे : पुण्यात एका मजुनीने एकतर्फी प्रेमातून मुलीच्या घरासमोरच गोंधळ घालत तिच्या कुटुंबाला “तिला उचलून घेऊन जातो, तुम्हाला काय करायचे ते करा” अशी धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

    याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार राहुल धुमाळ (वय २५) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यमुनानगर भागात दोन दिवसांपूर्वी (दि. २५ सप्टेंबर) रात्री हा प्रकार घडला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर त्याचे एकतर्फी प्रेम आहे. तो गेल्या एक वर्षापासून तिचा पाठलाग करत होता. त्याने मुलीला स्वतःचा मोबाईल क्रमांक देऊन फोन करण्यास देखील सांगितले होते. मात्र, अल्पवयीन मुलीने त्याला नकार दिला. तसेच त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु, त्याने या रागातून या मुलीच्या घरासमोर येऊन गोंधळ घालत कुटुंबाला ‘मीतुझ्यावर प्रेम करतो, तुला उचलून घेऊन जातो’ तुम्हाला काय करायचे ते करा”,  असे म्हणत गोंधळ घातला असल्याचे म्हंटले आहे. अधिक तपास विमानतळ पोलीस अधिक करत आहेत.