नगरसेविकेच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देत खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक

युवराज राष्ट्रवादीच्या नगरसेविका नंदा लोणकर यांचा मुलगा आहे. युवराज यांना काही दिवसांपुर्वी आरोपीने फोन केला. पुण्यातील एका गुंडाने तुला मारण्यासाठी ६ लाख हजारांची सुपारी दिली आहे. तु जर मला ४०हजार रूपये दिले नाही, तर मी तुला ठार मारेल, अशी धमकी युवराजला दिली होती. त्यानुसार त्यांनी खंडणी विरोधी पथकाने तक्रार केली होती.

    पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेविका नंदा लोणकर यांच्या मुलाला जीवे मारण्यासाठी सहा लाखांची सुपारी मिळाली आहे. जर ४० हजार रूपये नाही दिले तुला ठार मारू अशी धमकी देउन खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या सराईताला खंडणी विरोधी पथकाने कर्जतमध्ये जाउन अटक केले. सचिन मारूती शिंदे (वय ३२ रा. कर्जत, रायगड, मूळ-तरडगाव फलटण) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी नगरसेविका नंदा लोणकर यांचा मुलगा युवराज नारायण लोणकर यांनी तक्रार दिली आहे.

    युवराज राष्ट्रवादीच्या नगरसेविका नंदा लोणकर यांचा मुलगा आहे. युवराज यांना काही दिवसांपुर्वी आरोपीने फोन केला. पुण्यातील एका गुंडाने तुला मारण्यासाठी ६ लाख हजारांची सुपारी दिली आहे. तु जर मला ४०हजार रूपये दिले नाही, तर मी तुला ठार मारेल, अशी धमकी युवराजला दिली होती. त्यानुसार त्यांनी खंडणी विरोधी पथकाने तक्रार केली होती.

    पोलिसांनी केलेल्या तांत्रिक विश्‍लेषणानुसार, आरोपी कर्जत रायगडमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी सचिन शिंदे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पैशांची चणचण भासल्यामुळे युवराज लोणकर यांना फोन करून खंडणीची मागणी केल्याची कबुली दिली.