विठ्ठल हनुमंत माळवदकर यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या फिर्यादीनुसार,प्रशांत दादासाहेब गायकवाड, गोपिनाथ भाऊसाहेब गायकवाड (दोघे रा.बाभुळगाव दुमाला,ता. कर्जत,जि.अहमदनगर), पप्पू कवडे, राहुल खरात(दोघेही ‌रा.कात्रज,या.करमाळा,जि.सोलापूर) यांच्या सह इतर दोन अनोळखी युवकांवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    बारामती:  प्रेमविवाह केल्याच्य रागातून युवकाला ‌बेदम मारहाण करून त्याच्या पत्नीचे अपहरण केले.या महिलेच्या चुलत भावाने साथीदारांच्या मदतीने हे कृत्य केले आहे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला ‌असून यामध्ये दोन अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे.

    याप्रकरणी विठ्ठल हनुमंत माळवदकर यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.या फिर्यादीनुसार,प्रशांत दादासाहेब गायकवाड, गोपिनाथ भाऊसाहेब गायकवाड (दोघे रा.बाभुळगाव दुमाला,ता. कर्जत,जि.अहमदनगर), पप्पू कवडे, राहुल खरात(दोघेही ‌रा.कात्रज,या.करमाळा,जि.सोलापूर) यांच्या सह इतर दोन अनोळखी युवकांवर बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,ही घटना रविवारी (दि २६) बारामती औद्योगिक वसाहत परीसरातील मोतानगर जवळ घडली.फिर्यादी माळवदकर याने सज्ञान असलेल्या नात्यातील महिलेशी पळून जाऊन लग्न केले होते.या विवाहाला सदर महिलेच्या कुटूंबियांचा विरोध होता. त्यामुळे पळून जाऊन त्यांनी रजिस्टर लग्न केले. लग्न केल्यानंतर ते दोघे बारामतीत भाडोत्री घरात राहत होते. यावेळी दोन कारमधूनवरील सहाजण आले.या सहा जणांनी माळवदकर याला हाॅकी स्टिकने तसेच लाथा- बुक्यांनी बेदम मारहाण केली.तसेच माळवदकर याला पकडून त्याच्या पत्नीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिचे अपहरण केले.यानंतर सर्व जण पसार झाले ‌या घटनेनंतर माळवदकर यांनी बारामती तालुका पोलिस ठाणे गाठले, यावेळी प्राथमिक उपचारानंतर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली.