One India One Gold Rate presented by Malabar Gold and Diamonds

शनिवारी सायंकाळी बावधन येथील लग्न मुहूर्त लॉन्स येथे एक लग्न होते. या लग्नासाठी फिर्यादी शिंदे गेले होते. यावेळी लाल रंगाच्या लेडीज पर्समध्ये एक मोबाईल, ३५ ग्रॅम वजनाचे दागिने, ३० ग्रॅम चांदीचे ३ कॉईन असा २ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज असलेली पर्स चोरट्याने लांबवली.

    पिंपरी : मंगल कार्यालयात लग्नासाठी आलेल्या एका व्यावसायिकाकडील अडीच लाखांचे सोन्याचे, चांदीचे दागिने असलेली पर्स चोरीला गेली. ही घटना बावधन येथील लग्न मुहूर्त लॉन्स येथे शनिवारी सायंकाळी घडली.

    सुनिल गोवर्धन शिंदे (वय ५३, रा. पिंपळे-सौदागर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शनिवारी सायंकाळी बावधन येथील लग्न मुहूर्त लॉन्स येथे एक लग्न होते. या लग्नासाठी फिर्यादी शिंदे गेले होते. यावेळी लाल रंगाच्या लेडीज पर्समध्ये एक मोबाईल, ३५ ग्रॅम वजनाचे दागिने, ३० ग्रॅम चांदीचे ३ कॉईन असा २ लाख ५० हजार रूपयांचा ऐवज असलेली पर्स चोरट्याने लांबवली.