मुलगी झाली म्हणून विवाहितेचा छळ

आरोपींनी मुलगी झाल्याच्या कारणावरून तसेच इतर वेगवेगळ्या कारणावरून पीडित विवाहिता आणि तिच्या आई - वडिलांना शिवीगाळ केली. तसेच विवाहितेला हाताने मारहाण करून शाब्दिक टोमणे मारून वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला

    पिंपरी: आज २१ व्या शतकाकडे वाटचाल करत असताना मुलांच्या बरोबरीने मुली प्रत्येक क्षेत्रात खांद्याला खांदा देऊन काम करत आहे. अनेक क्षेत्रामध्ये मुलींनी उतुंग भरारी मारलेलीही आपण पाहिली आहेत. देशात लिंगभेदाच्या घटना कमी होताना दिसत असताना दुसरीकडे अद्यापही मुलगी मुलगा असा भेद होताना दिसून येत आहे. अशातच पिंपरी चिंचवडयामधील चाकण येथे मुलगी झाल्याच्या करणावरून सासरचे लोकं विवाहितेचा छळ करत असल्याचे समोर आले आहे.

    मुलगी झाली म्हणून विवाहितेला हाताने मारहाण करून शाब्दिक टोमणे मारून शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात आहे. या प्रकरणी

    खेड तालुक्यातील दळ्यांचीवाडी येथील योगेश काळूराम सप्रे (वय २९), काळुराम वामन सप्रे, निलेश काळूराम सप्रे, अर्जुन वामन सप्रे आणि तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित विवाहितेने चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींनी मुलगी झाल्याच्या कारणावरून तसेच इतर वेगवेगळ्या कारणावरून पीडित विवाहिता आणि तिच्या आई – वडिलांना शिवीगाळ केली. तसेच विवाहितेला हाताने मारहाण करून शाब्दिक टोमणे मारून वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलिस तपास करीत आहेत.