शनिवार, रविवार जनता कर्फ्यू लावण्याची महापौरांची आयुक्तांना सूचना

मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला चौदाशेहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. रुग्ण वाढत असतानाही नागरिकांकडून बेफिकीरी केली जात आहे. मास्क परिधान केला जात नाही. भाजी मंडई, व्यापारी मार्केटमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तिथे निर्बंध कडक केले पाहिजेत. चौकांमध्ये जमावबंदी लावावी. नागरिकांवर बंधने लादली पाहिजेत.

    पिंपरी : पिंपरी – चिंचवड शहरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक आहे. नागरिकांकडून नियमांचे पालन होताना दिसत नाही. निर्बंध कडक करणे आवश्यक आहे. त्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी शहरात जनता कर्फ्यू लागू करावा, अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी महापालिका आयुक्तांना केली आहे.

    महापौर म्हणाल्या, मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला चौदाशेहून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. रुग्ण वाढत असतानाही नागरिकांकडून बेफिकीरी केली जात आहे. मास्क परिधान केला जात नाही. भाजी मंडई, व्यापारी मार्केटमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तिथे निर्बंध कडक केले पाहिजेत. चौकांमध्ये जमावबंदी लावावी. नागरिकांवर बंधने लादली पाहिजेत. त्यासाठी येत्या शनिवारी आणि रविवारी जनता कफ्र्यू लावावा अशी सूचना आयुक्तांना केली आहे. त्यावर जिल्हाधिकाNयांशी बोलून निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले असल्याचे महापौर ढोरे यांनी स्पष्ट केले.