आगीच्या घटनेमुळे व्यापारी हवालदिल ; कुणाचा रोजगार बुडाला तर कुणाला सतावतेय दोन वेळाच्या अन्नाची भ्रांत

खरेदीसाठीची छोटी -मोठी तब्बल दोन हजार दुकाने आहेत. या दुकानांमध्ये रोजंदारी पद्धतीने शेकडो लोक काम करतात घटनेमुळे त्यांचा रोजगार बंद झाला आहे. तर आगीमध्ये मोठ्या प्रमाणात झाकलेले नुकसान कसे भरून काढायचे हा मोठा प्रश्न दुकान मालकांना पडला आहे.

    पुणे: कॅम्प परिसरात शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या फॅशन स्ट्रीटमध्ये घडलेल्या आगीच्या घटनेत व्यापाऱ्यानेचे कोट्यवधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेला होळीचा तर काही महिन्यावर येऊन ठेपलेल्या ईद च्या सणांचा विचार करून अनेक दुकान दुकानदारांनी दुकानात माल भरला होता. मात्र रात्री अचानक लागलेल्या आगीच्या घटनेने संपूर्ण माल जाळून खाक झालेले समोर आले आहे.

    खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या फॅशन स्ट्रीटमध्ये खरेदीसाठीची छोटी -मोठी तब्बल दोन हजार दुकाने आहेत. या दुकानांमध्ये रोजंदारी पद्धतीने शेकडो लोक काम करतात घटनेमुळे त्यांचा रोजगार बंद झाला आहे. तर आगीमध्ये मोठ्या प्रमाणात झाकलेले नुकसान कसे भरून काढायचे हा मोठा प्रश्न दुकान मालकांना पडला आहे.

    कोरोनामुळे गतवर्षी पडललेल्या लॉकडाऊनमुळे खेरदी विक्रीचा व्यवसाय पूर्णपाने बंद होता. या मागीलअवघ्या काही महिन्यांपासून स्थिती पूर्वपदावर येत लोक खरेदीसाठी बाहेर पडू लागले होते. मात्र पूर्वी इतकी खरेदीला वर्दळ नव्हती. परंतु आता एकामागून एक येणाऱ्या सणांमुळे स्थिती पूर्व पदावर येईल ही आशा व्यापारी वर्गामध्ये निर्माण झाली असताना आगीची घटना घडली. या घटनेने व्यापारी हवालादिल झाले असून नुकसान कसे भरून काढायचे असा प्रश्न व्यापाऱ्यांच्या समोर निर्माण झाला आहे.

    या घटनेमुळे अनेक लोकं बेरोजगार तर झालेच मात्र अनेकांच्या घरी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत निर्माण झाली आहे. आगीच्या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी पीडित व्यापारी वर्गाने केली आहे. तसेच दोषींवर कारवाई करावी असेही म्हटले आहे.