म्हाडाने अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवली

सोडतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने म्हाडाने अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागरिकांना म्हाडाच्या घरांसाठी २२ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज म्हाडाच्या संकेतस्थळावर करता येणार आहे.

    पुणे : म्हाडाने ४ हजार २२२ सदनिकांसाठी सोडत जाहीर केली आहे. या सोडतीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून ५२ हजार ९२८ इतके अर्ज आले आहेत. घरांच्या सोडतीसाठी गुरुवारी (दि. १६) शेवटची मुदत होती. मात्र, सोडतीसाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने म्हाडाने अर्ज स्विकारण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागरिकांना म्हाडाच्या घरांसाठी २२ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज म्हाडाच्या संकेतस्थळावर करता येणार आहे. तर सोडत ७ जानेवारी २०२२ ला पुणे जिल्हा परिषद सभागृह येथे होणार आहे.