
आयान अशपाक खान ( वय १९) आणि नवनाथ संभाजी गिरी (वय १९) यांना अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयान खान व पिडीत मुलगी यांची ओळख होती.
पुणे : लोणीकंद परिसरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला व्हिडीओ कॉल करून नग्न होण्यास भाग पाडले. त्यानंतर तिचे नग्न अवस्थेतील स्क्रीनशॉट काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी आयान अशपाक खान ( वय १९) आणि नवनाथ संभाजी गिरी (वय १९) यांना अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा प्रकार २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयान खान व पिडीत मुलगी यांची ओळख होती. त्याने मुलीशी जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवले होते. त्यानंतर त्याने तिला व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर तिला कपडे काढण्यास भाग पाडले. तसेच, लग्न अवस्थेतील स्क्रीनशॉट काढून घेतले. हे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी नवनाथ गिरीने मुलीला दिली. तसेच, तिच्यावर अत्याचार केला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.