इ़ंदापूरात ‘महाराष्ट्र बंद’ला संमिश्र प्रतिसाद; बंद १०० टक्के यशस्वी ‌झाल्याचा महाविकास आघाडीचा दावा

लखीमपूर शेतकरी हल्ला प्रकरण व केंद्र सरकारच्या कथित शेतकरीविरोधी विषयक धोरणांच्या निषेधार्थ पुकारलेल्या 'महाराष्ट्र बंद'ला इंदापूर तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.

    इंदापूर : लखीमपूर शेतकरी हल्ला प्रकरण व केंद्र सरकारच्या कथित शेतकरीविरोधी विषयक धोरणांच्या निषेधार्थ पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ला इंदापूर तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. या संदर्भात महाविकास आघाडीतील पक्षांनी बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा केला आहे.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे व त्यांच्या सहका-यांनी तसेच शिवसेनेचे शहराध्यक्ष महादेव सोमवंशी व त्यांच्या सहका-यांनी सकाळीच इंदापूर शहरात फिरुन व्यापारी वर्गास बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्या आवाहनात शहरात चांगला प्रतिसाद मिळाला.

    अत्यावश्यक सेवा वगळता इतर दैनंदिन व्यवहार दुपारी चार वाजेपर्यंत पूर्णपणे बंद होती. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्निल सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होत, तहसीलदारांकडे निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या वतीने पोलीस ठाण्याकडे निवेदन दिले.