MNS riots erupt ... and Amazon office blown up by MNS activists

मनसेने मराठी भाषेला ‌ॲमेझॉनच्या वेबसाईटवर समाविष्ठ करावे असा पवित्रा घेतला होता. यासाठी त्यांनी तसे पत्रही ॲमेझॉनच्या संस्थापकाला पाठवले होते. ॲमेझॉनने मराठी भाषेला वेबसाईटवर स्थान दिल्यास मराठी भाषिकांना सोपे होईल असे या पत्रात म्हटले होते.

पुणे : मराठी भाषेवरून (Marathi Language) पुन्हा एकदा मनसे (MNS) आणि अ‍ॅमेझॉन (Amazon) यांच्यात वाद पेटला आहे. अ‍ॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहिम सुरु केली. यानंतर अ‍ॅमेझॉनने दिंडोशी कोर्टाकडून (Dindoshi Court) मनसे अध्यक्ष (Raj Thackeray) राज ठाकरे यांना नोटीस बजावली आहे. त्यामुळे राज ठाकरे आणि मनसे सचिवांना ५ जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. पुण्यात मनसे कार्यकर्त्यानी कोंढव्यातील ॲमेझॉनचे कार्यालय फोडले आहे.

मनसेने मराठी भाषेला ‌ॲमेझॉनच्या वेबसाईटवर समाविष्ठ करावे असा पवित्रा घेतला होता. यासाठी त्यांनी तसे पत्रही ॲमेझॉनच्या संस्थापकाला पाठवले होते. ॲमेझॉनने मराठी भाषेला वेबसाईटवर स्थान दिल्यास मराठी भाषिकांना सोपे होईल असे या पत्रात म्हटले होते. परंतु ॲमेझॉनकडून याबाबतीत सकारात्मक पाउले न उचल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नो मराठी, नो ॲमेझॉन मनसेचा नारा

ॲमेझॉनक़डे पत्राद्वारे मागणी करुनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे मनसे कर्यकर्त्यांकडून नो मराठी, नो ॲमेझॉन मोहीम हाती घेतली आहे. तसेच मनसे अध्यक्ष यांना नोटीस पाठवल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रीतल ॲमेझॉनचे पहिले कार्यालय फोडले आहे. पुणे, कोंढवा मनसे प्रभाग अध्यक्ष अमित जगताप यांच्या नेतृत्वात ॲमेझॉनच्या कार्यालयावर धडक आंदोलन केले आहे.