सराईत गुन्हेगाराला पकडण्यास गेलेल्या पोलीस पथकावर जमावाचा हल्ला

येरवडा परिसरात कोते वस्ती आहे. येथे सर्वधर्मसमभाव नावाची म्हाडाची वसाहत आहे. शक्‍ती सिंह नावाचा रेकॉर्डवरील गुन्हेगार साथीदारांच्या मदतीने परिसरातील नागरिकांना त्रास देत होता. नागरिकांनी या बाबत पोलीसांकडे तक्रार दिली होती. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर येरवडा पोलीस ठाण्याचे पथक शक्‍ती सिंहला पकडायला गेले होते.

    पुणे : पिंपरी चिंचवड भागात गुन्हेगारांनी पोलिसांवर गोळीबार केल्याचा प्रकार ताजा असताना पुण्यात देखील एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यास गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केला. जमाव खूपच आक्रमक झाल्याने पोलिसांना स्वत:च्या रक्षणार्थ हवेत गोळीबार करावा लागल्याचा खळबळजनक प्रकार घडला घडला आहे. या गोंधळात दोन पोलीस जखमी झाले आहेत. येरवडा परिसरात ही घटना घडली आहे.याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    माहितीनुसार, येरवडा परिसरात कोते वस्ती आहे. येथे सर्वधर्मसमभाव नावाची म्हाडाची वसाहत आहे. शक्‍ती सिंह नावाचा रेकॉर्डवरील गुन्हेगार साथीदारांच्या मदतीने परिसरातील नागरिकांना त्रास देत होता. नागरिकांनी या बाबत पोलीसांकडे तक्रार दिली होती. ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर येरवडा पोलीस ठाण्याचे पथक शक्‍ती सिंहला पकडायला गेले होते.

    रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. पण, शक्ती सिंहच्या लक्षता हा प्रकार आला. त्याने त्याच्या समाजातील नागरिकांना एकत्र करून पोलिसांविरुद्ध भडकावले. त्यानंतर हे नागरिक पोलिसांवर चालून आले. त्यांनी पोलिसांना अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच तुफान गोंधळ देखील घातला. जमाव जास्तच आक्रमक होत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी स्वरक्षणार्थ पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. त्यानंतर नागरिकांचा जमाव पांगला. त्यानंतर पथकाने शक्‍ती सिंहला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले. मात्र यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता.