…अन् जन्मदात्या पित्याच्या अश्रूंचा फुटला बांध; युक्रेनमध्ये अडकलेली मोनिका दाभाडे स्वगृही

अचानक उद्भवलेल्या युक्रेन-रशिया युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकून पडलेली लोणावळ्यातील मोनिका मारुती दाभाडे ही मुंबई विमानतळावर उतरली आणि पळत जाऊन थेट आपल्या जन्मदात्या बापाच्या गळ्यात जाऊन पडली. यामुळे हडबडून गेलेल्या आणि आपल्या लेकीच्या आगमन झाल्याचे पाहून बापाच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला.

    लोणावळा : अचानक उद्भवलेल्या युक्रेन-रशिया युद्धामुळे युक्रेनमध्ये अडकून पडलेली लोणावळ्यातील मोनिका मारुती दाभाडे ही मुंबई विमानतळावर उतरली आणि पळत जाऊन थेट आपल्या जन्मदात्या बापाच्या गळ्यात जाऊन पडली. यामुळे हडबडून गेलेल्या आणि आपल्या लेकीच्या आगमन झाल्याचे पाहून बापाच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला.

    युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मोनिकाचे वडील मारुती दाभाडे हे लोणावळा शहरात टॅक्सी चालक म्हणून काम करतात. घरची परिस्थिती नसतानाही मुलीची इच्छा पूर्ण करण्याकरिता स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन तिला साता समुद्रापार शिक्षणासाठी पाठवण्याची हिम्मत त्यांनी दाखवली.

    मागील सहा वर्षांपासून युक्रेनमध्ये राहत शिक्षण घेणाऱ्या मोनिकाच्या एमबीबीएसच्या अखेरच्या वर्षाची केवळ दोन महिने शिल्लक असताना युक्रेन आणि रशियात युद्धाचा भडका उडाला. त्यादिवसापासून मोनिका हिचा जीव मुठीत घेऊन आपल्या मायदेशी परतण्याचा संघर्ष सुरू झाला. मात्र, तिचा हा संघर्ष सुरू असताना तिच्या काळजीत अखंड बुडालेल्या तिच्या आई आणि वडिलांची परिस्थिती तिच्यापेक्षाही बिकट झाली होती.

    बॉम्ब आणि मिसाईल पडताना पाहिले  

    मोनिका हिने तिच्या या सर्व खडतर प्रवासाबद्दल सांगितला की, ‘मी युक्रेनमध्ये ओडेसा युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते. युद्ध सुरू झाल्यावर आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्याने बॉम्ब आणि मिसाईल पडताना बघत होतो. तिथे होत असलेल्या स्फोटांचे आणि सायरनचे आवाज अजूनही माझ्या कानात घुमत आहे.