सलग दुसऱ्या दिवशी पुण्यात शंभराहून अधिक कोरोना रुग्ण

सलग दुसऱ्या दिवशी शंभराहून अधिक रुग्ण काेराेनाबाधित आढळून आल्याने, सक्रीय रुग्णांची संख्या ८६३ इतकी झाली आहे. आजपर्यंत शहरात एकुण ५ लाख ८ हजार४१ जणांना काेराेनाची लागण झाली.

    पुणे : शहरात सलग दुसऱ्या दिवशी शंभराहून अधिक काेराेनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ३८ जणांनी काेराेनावर मात केली असून , शहरात एकाही रुग्णाच्या मृत्युची नाेंद झाली नाही. संशयित ६ हजार २७ रुग्णांची चाचणी केली गेली. यात १२२ रुग्ण काेराेनाबाधित आढळून आले. सलग दुसऱ्या दिवशी शंभराहून अधिक रुग्ण काेराेनाबाधित आढळून आल्याने, सक्रीय रुग्णांची संख्या ८६३ इतकी झाली आहे. आजपर्यंत शहरात एकुण ५ लाख ८ हजार४१ जणांना काेराेनाची लागण झाली. तर ४ लाख ९८ हजार ६९ जणांनी काेराेनावर मात केली. ९ हजार १०९ जणांचा मृत्यू झाला आहे.