पुण्यात परदेशांतून आलेल्यांपैकी एकाही नागरीकाला काेराेनाच्या नवीन स्ट्रेनची लागण नाही ; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे : शहरात इंग्लड , युराेपीयन देशांतून आलेल्यांपैकी चाचणी केलेल्या एकाही नागरीकांत काेराेनाच्या नवीन स्ट्रेनची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप परदेशातून आलेल्या शंभराहून अधिक नागरीकांना शाेध लागला नसुन, त्यांनी महापालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी केले आहे.

पुणे : शहरात इंग्लड , युराेपीयन देशांतून आलेल्यांपैकी चाचणी केलेल्या एकाही नागरीकांत काेराेनाच्या नवीन स्ट्रेनची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप परदेशातून आलेल्या शंभराहून अधिक नागरीकांना शाेध लागला नसुन, त्यांनी महापालिकेशी संपर्क साधावा असे आवाहन महापाैर मुरलीधर माेहाेळ यांनी केले आहे.

मंगळवारी सकाळपासूनच पुण्यात एकाला काेराेनाच्या नवीन स्ट्रेनची लागण झाल्याचे वृत्त पसरले हाेते. यासंदर्भात महापाैर माेहाेळ यांनी प्रसारमाध्यमांना निवेदनाद्वारे माहीती कळविली आहे. ‘‘ पुण्यात इंग्लड िकंवा युराेपियन देशातून २५ नाेव्हेंबरनंतर ५४२ प्रवासी दाखल झाले आहेत. त्यापैकी २७० जणांची चाचणी केली गेली आहे. त्यांच्या चाचणी अहवालात एकाही नागरीकाला काेराेनाच्या नवीन स्ट्रेनची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत तपासले गेलेल्या एका व्यक्तीच्या चाचणी अहवालात नवीन स्ट्रेनची लागण झाल्याचे नमूद केले आहे. ही व्यक्ती चेन्नई येथील आहे. पुण्यात परतलेल्या आणि चाचणी झालेल्या एकाही नागरीकाला नवीन स्ट्रेनची लागण झालेली नाही.’’ असे महापाैर माेहाेळ यांनी नमूद केले.

महापालिकेशी संपर्क साधावा
इंग्लड अािण युराेपियन देशातून परतलेल्या नागरीकांचा शाेध घेण्यात येत अाहे. अद्याप १०९ नागरीकांचा शाेध लागला नाही. या नागरीकांनी महापािलकेशी संपर्क साधावा. चाचणी करून घ्यावी असे अावाहन महापाैर माेहाेळ यांनी केले अाहे. अशा व्यक्ती बाबत नागरीकांना माहीती कळाली असेल, तर त्या व्यक्तीला चाचणी करण्यास सांगावे, तसेच त्या व्यक्तीची माहीती महापािलकेला कळवावी. या शाेध लागत नसलेल्या नागरीकांचा पाेिलसांच्या मदतीने शाेध घेण्यात येत अाहे. असेही माेहाेळ यांनी नमूद केले.

अॅक्टीव रुग्णांच्या संख्येत घट
शहरातील काेराेनाच्या अॅक्टीव रुग्णांच्या संख्येत झाली असुन, त्यांची संख्या चार हजाराच्या खाली आली आहे. मंगळवारी ही संख्या ३ हजार ५८४ इतकी झाली आहे. दिवसभरात काेराेना बाधित २३८ नवीन रुग्ण आढळून आले. तर ४८० रुग्णंानी काेराेनावर मात केल्याने त्यांना घरी साेडण्यात आले आहे. तर पुण्याबाहेरील तीन जणांसह नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३१३ रुग्णांची प्रकृती गंभीर असुन, त्यापैकी १६९ रुग्णांवर व्हेंटीलेटरच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत. आजपर्यंत शहरात एकुण १ लाख ७८ हजार २५८ काेराेना बाधित रुग्ण आढळुन आले, त्यापैकी १ लाख ७० हजार ५१ रुग्णांनी काेराेनावर मात केली आहे. तर ४ हजार ६२३ रुग्णांचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे.