मुलीचा बालविवाह लावणाऱ्या वडिलांविरोधात आईचीच पोलीसात तक्रार ; सासवड पोलीसांत गुन्हा दखल

फिर्यादी ममता पवार या आपल्या तिन्ही मुलांसह आपल्या आईकडे मु. पो. केंदळी (ता. मंटा जि.जालना) येथे राहतात. त्यांचा नवरा आरोपी राजु पवार हा मोलमजुरीचे फिरते स्वरुपाचे काम करतो, तसेच फिर्यादी देखील मोलमजुरी करतात आरोपी हा आपल्या १३ वर्षीय मुलीला घेऊन पुरंदर तालुक्यातील चांबळी येथे आला होता. आरोपी सोबत त्याची मुलगी देखील सहा महिन्यापासून आपल्या वडिलांसोबत पुरंदर तालुक्यातील चांबळी येथे राहत आहे.

    सासवड: पुरंदर तालुक्यातील चांबळी येथे मुलीचा बालविवाह लावून देणाऱ्या वडिला विरोधात मुलीची आई ममता पवार यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात मुलीचे वडील आरोपी राजू रंगलाल पवार याच्यासह इतर ५ आरोपीं विरोधात सासवड पोलिसांनी बालविवाह प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

    या संदर्भात सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ममता पवार या आपल्या तिन्ही मुलांसह आपल्या आईकडे मु. पो. केंदळी (ता. मंटा जि.जालना) येथे राहतात. त्यांचा नवरा आरोपी राजु पवार हा मोलमजुरीचे फिरते स्वरुपाचे काम करतो, तसेच फिर्यादी देखील मोलमजुरी करतात आरोपी हा आपल्या १३ वर्षीय मुलीला घेऊन पुरंदर तालुक्यातील चांबळी येथे आला होता. आरोपी सोबत त्याची मुलगी देखील सहा महिन्यापासून आपल्या वडिलांसोबत पुरंदर तालुक्यातील चांबळी येथे राहत आहे.

    गुरुवारी (दि.१७) जून २०२१ रोजी फिर्यादी ममता पवार यांना त्यांचे मामा प्रकाश चव्हाण यांनी सांगितले की तुझा मालक राजू पवार यांने तुझ्या मुलीचं लग्न सुरेश ताराचंद चव्हाण यांच्यासोबत लावून दिला आहे. हे समजताच फिर्यादी या त्यांच्या नातेवाईकांसोबत चांबळी येथे आले असता त्यांना त्यांच्या मामाने मोबाईल मध्ये मुलीच्या लग्नाचे फोटो दाखवले. आपल्या मुलीचा बालविवाह लावून दिली याची खात्री झाल्यानंतर त्यांनी या संदर्भात सासवड पोलीस ठाण्यामध्ये बाल विवाह प्रतिबंध कायद्यानुसार फिर्याद दाखल केली आहे.

    पोलिसांनी मुलीचे वडील आरोपी राजु रंगलाल पवार रा. असुंबा तालुका जिल्हा जळगाव, राजकन्या सदाशिव पवार, अबु रमेश पवार, मुकेश रमेश पवार, अजय रमेश पवार सर्व रा. असलगाव तालुका जिल्हा बुलढाणा, नवरदेव सुरेश ताराचंद चव्हाण व नवरदेवाचे आई वडील यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, भारतीय दंड विधान कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सासवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खोमणे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.