भिमसृष्टी येथे विविध समाविचारी संघटनांचा आंदोलन

माजी नगरसेवक भापकर यांनी जोपर्यंत भिमसृष्टीमध्ये मनुस्मृती दहन उठाव शिल्प लावणार नाही तोपर्यंत दरवर्षी दि. २५ डिसेंबर रोजी मनपा विरोधात जनआंदोलन करण्यात येईल अशी भूमिका मांडली.

पिंपरी:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक याठिकाणी उभारण्यात आलेल्या भिमसृष्टी प्रकल्पामध्ये मनुस्मृती दहन प्रसंग उठाव शिल्पाचा समावेश न केल्याने महानगरपालिकेचा निषेध करण्यासाठी भिमसृष्टी, पिंपरी याठिकाणी शहरातील विविध समाविचारी संघटनांच्या वतीने निदर्शने करून आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना जेष्ठ विचारवंत मानव कांबळे म्हणाले की, महानगरपालिकेने जाणीवपूर्वक दोन वर्ष उलटून गेले तरी मनुस्मृती दहन या ऐतिहासिक व क्रांतिकारक घटनेच्या प्रसंगाचा समावेश केला नाही. येत्या काळात जर सदरचे शिल्प बसविण्यास दिरंगाई केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. माजी नगरसेवक भापकर यांनी जोपर्यंत भिमसृष्टीमध्ये मनुस्मृती दहन उठाव शिल्प लावणार नाही तोपर्यंत दरवर्षी दि. २५ डिसेंबर रोजी मनपा विरोधात जनआंदोलन करण्यात येईल अशी भूमिका मांडली.
या आंदोलनामध्ये माजी नगरसेवक मारूती भापकर, चंद्रकांता सोनकांबळे, वंदना जाधव, सविता खराडे, आनंदा कुदळे,गिरीश वाघमारे, हणमंत माळी, पी.के. महाजन,संतोष जोगदंड, विशाल जाधव, प्रकाश जाधव, सतिश काळे, युवराज दाखले,ऍड .लक्ष्मण रानवडे, हरिष मोरे,रशिद सय्यद, धम्मराज साळवे, सुरेश गायकवाड, सिद्दीक शेख, वैजनाथ शिरसाठ, माऊली बोराटे, विष्णु मांजरे, विजय जगताप, गौतम गजभार, मनोज गजभार सहभागी होते.