एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने विष प्राशन करून संपविले जीवन

स्पर्धा परीक्षेची (एमपीएससी) तयारी करणाऱ्या एका 31 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या (Suicide in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

    पुणे : स्पर्धा परीक्षेची (एमपीएससी) तयारी करणाऱ्या एका 31 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या (Suicide in Pune) केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. अमर मोहिते (वय 31) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अमर हा मूळचा सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील होता. गेल्या काही वर्षांपासून तो पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. तो सदाशिव पेठ येथील विठ्ठल मंदिर परिसरात राहत होता. मात्र, त्याने मध्यरात्री खोलीत आत्महत्या केली. आज सकाळी हा प्रकार समोर आला. मुलांनी ही माहिती पोलिसांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मोहिते याने नेमकी आत्महत्या का केली हे समजू शकलेले नाही.

    दरम्यान, अमर शारीरिक परीक्षेतून (फिजिकल) बाहेर पडला होता. त्यामुळे तो नैराश्यात होता, असे सांगितले जात आहे. त्यातून त्याने आत्महत्या केली असावी असा संशय आहे.