तुळशीबागेत लवकरच मनसोक्त खरेदी करता येणार ?

पुणे ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाधीत क्षेत्र सोडून उर्वरित भागातील जनजीवन टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येत आहे .त्या अनुषंगाने तुळशीबागेतील बाजारपेठ सुद्धा सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली सुरु झाल्या. आहेत. त्यादृष्टीकोनातून महापालिका अधिकाऱ्यांनी शनिवारी तुळशीबाग परिसराची पाहणी केली.

यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, अतिरिक्त आयुक्त शंतनु गोयल, पालिका उपायुक्त अतिक्रमण विभाग माधव जगताप, विभागिय अधिकारी ढोकळे  तुळशीबाग परिसर व्यापारी असोसिएशन नितीन पंडित आदी उपस्थित होते. सुरक्षिततेचे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून ठरावीक दुकाने व पथारी  व्यवसाय सुरु करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. याबाबत आता पालिकेचे आयुक्त गायकवाड अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यानंतरतुळशीबाग बाजारपेठ सुरु होणार आहे. 
दरम्यान, तुळशीबागेत सुमारे ३०० दुकाने आहेत. त्याप्रमाणे एका आड एक दुकान सुरू करणे, तुळशीबागेच्या सहा गल्ल्या आहेत, त्याच्या एन्ट्री पॉईंटला सुरक्षा रक्षक नेमून, ग्राहकांचे सॅनिटायझेशन करणे आणि बॉडी टेम्प्रेचर तपासणे आदी नियोजन नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनानुसार एक दुकान आठवड्यातून सुमारे दोनवेळा उघडले जाणार आहे. तुळशीबागेत काम करणारे काही कामगार प्रतिबंधित क्षेत्रातील आहेत. त्यांची यादी बनवायचे काम सुरू आहे. त्यांना तुर्तास कामावर न येण्याच्या सूचना करण्यात आल्याचे पंडीत यांनी स्पष्ट केले होते.