लग्नाचा टिळा लावण्यासाठी निघालेल्या तरुणाचा खून ; भरदिवसा अंगाचा थरकाप उडविणाऱ्या घटनेने खळबळ

अनिल राजेंद्र जाधव (वय २१, रा. डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल याचा विवाह ठरला होता. त्याच्या टिळ्याचा कार्यक्रम आजच रात्री होता.

    पुणे : अंलकार सारख्या उच्चभ्रु परिसरात लग्नाचा टिळा लावण्यासाठी निघालेल्या तरूणाचा भररस्त्यात तलवारीने सपासप वारकरून निघृण खून केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. भरदिवसा या खूनाचा थरार घडला असून, पाहणाऱ्यांच्या देखील अंगाचा थरकाप उडाला होता. हा प्रकार समजताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

    अनिल राजेंद्र जाधव (वय २१, रा. डहाणूकर कॉलनी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल याचा विवाह ठरला होता. त्याच्या टिळ्याचा कार्यक्रम आजच रात्री होता. त्याची घाई सुरू होती. त्याची एक बहिण डहाणूकर कॉलनीतील लक्ष्णीनगर येथे राहत होती. तर, एक बहिण कर्वेनगर येथे राहण्यास होती. दरम्यान, तो दोन्ही बहिणीकडे ये-जा करत असत व अधून-मधून राहत देखील. दरम्यान, एका बहिणीला सोडण्यासाठी तो लक्ष्मीनगर येथे आला होता. बहिणीला सोडून तो दुचाकीने पोतनीस परिसरातून केफिप्टी रस्त्याने जात होता. त्याचवेळी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पाठिमागून आलेल्या दुचाकीवरील हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. तलवारीने त्याच्यावर सपासप वार करण्यात आले. भररस्त्यात त्याच्यावर हा हल्ला झाला. रक्तस्त्राव झाल्याने अनिल याचा जागिच मृत्यू झाला. हल्लेखोर पसार होताच नागरिकांनी ही माहिती पोलीसांना दिली. त्यानंतर अलंकार पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशारापर्यंत हल्याचे कारण आणि हल्लेखोरांचा थांगपत्ता लागला नव्हता. अधिक तपास पोलीस करत आहेत.