जबरदस्तीने धर्मांतराच्या विरोधात मुस्लीम राष्ट्रीय मंच आक्रमक भूमिका घेणार : अली दारूवाला

आपल्या लोकशाही देशात जबरदस्तीने धर्मांतरावर बंदी आहे. तरीही नियोजनपूर्वक धर्मांतर होताना दिसते. या मागे पैशाचा गैरवापर आहे. महाराष्ट्र, पुणे आणि कोंढव्यातील संघटनांचा वापर केला जात असल्याचा आरोप दारुवाला यांनी केला.

    पुणे : जबरदस्तीने होणाऱ्या धर्मांतरास मुस्लीम राष्ट्रीय मंचचा(Muslim National Forum) विरोध असून धर्मांतराच्या विरोधात यापुढे आक्रमक भूमिका घेतली जाणार आहे.धर्मांतराला पाठिंबा देणाऱ्या संघटनांना मिळणाऱ्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रीय मुस्लीम मंचाचे राज्य अध्यक्ष अली दारूवाला यांनी पत्रकार परिषदेत केले .

    कोणत्याही परिस्थितीमध्ये जबरदस्तीने धर्मांतर( against forcible conversion) करण्याची भूमिका आम्ही मान्य करणार नाही, असे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे प्रदेशाध्यक्ष अली दारूवाला यांनी सांगितले .त्यांनी या प्रकरणी निदर्शने करण्यासाठी परवानगी मागितली असताना ती मिळाली नाही .त्यामुळे पत्रकार परिषदेत पुढील भूमिका स्पष्ट करण्यात आली.

    कोंढव्यात शाहीन बाग निदर्शने, राज्यातील शेतकरी निदर्शना मागे याच २२ संघटना आहेत. उत्तर प्रदेशातील संघटना त्या मदरसाशी संबंधित आहेत. जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या कामात आहेत. आपल्या लोकशाही देशात जबरदस्तीने धर्मांतरावर बंदी आहे. तरीही नियोजनपूर्वक धर्मांतर होताना दिसते. या मागे पैशाचा गैरवापर आहे. महाराष्ट्र, पुणे आणि कोंढव्यातील संघटनांचा वापर केला जात असल्याचा आरोप दारुवाला यांनी केला. या संघटनांना मिळणाऱ्या निधीची चौकशी करावी, अशी मागणी अली दारुवाला यांनी केली. त्यातून अनेक गोष्टी बाहेर येतील, असेही दारुवाला यांनी सांगीतले.