लॉकडाऊनला माझा विरोध;  खाजगी रुग्णालयांत कोरोना चाचण्याचे रॅकेट- ॲड प्रकाश आंबेडकरांचा आरोप

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या म्हणण्यानुसार ८० टक्के लोकांना लक्षणेच नाहीत. ते लोक घरातच राहून उपचार घेवू शकतात.  लॉकडाऊन असताना सुद्धा रुग्ण संख्या वाढली. त्यामुळे  लॉकडाऊन हा पर्याय नाही, लॉकडाऊनला माझा विरोध आहे - ॲड प्रकाश आंबेडकर म्हणाले. 

    पुणे: खाजगी रुग्णालयांमधील कोरोना चाचणीचे रॅकेट सुरू झाले आहे, त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. खाजगी लॅबमध्ये कोरोना चाचणी पॉझिटिव्ह तर सरकारी रुग्णालयात निगेटिव्ह आल्याचा प्रकार अमरावतीत समोर आला आहे. त्यामुळे कोणत्या लॅबचा रिपोर्ट खरा हा प्रश्न आहे, असा सवाल करत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत चौकशीची मागणी केली आहे.

    लॉकडाऊनला माझा विरोध
    पुण्यात माध्यमंशी बोलताना  प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या म्हणण्यानुसार ८० टक्के लोकांना लक्षणेच नाहीत. ते लोक घरातच राहून उपचार घेवू शकतात असे त्यांचे म्हणणे आहे.  लॉकडाऊन असताना सुद्धा रुग्ण संख्या वाढली. त्यामुळे  लॉकडाऊन हा पर्याय नाही, लॉकडाऊनला माझा विरोध आहे,असेही आंबेडकर म्हणाले.


     
    सरकारने स्वतः कोव्हिड केंद्र चालवावे,
    जम्बो कोव्हिड सेंटर पुन्हा सुरू करून कंत्राटदारांना चालविण्यास दिली आहेत. तिथे अजिबात चांगली परिस्थिती नाही.  खाजगी डॉक्टरांना तिथे नेमले जात आहे. सरकारने स्वतः जम्बो कोव्हिड केद्र चालवावे,अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.