लता करे चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार

लताबाईंचे पती ह्दयविकाराने त्रस्त होते, त्यांच्या उपचारासाठी लताबाईंकडे पैसे नव्हते. त्यामुळे बारामती शहरात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत त्या सहभागी झाल्या होत्या,अनवाणी पायाने धावत ६६ वर्षीय लताबाई विजेत्या ठरल्या होत्या. त्यांच्या या कामगिरीची चर्चा देशभर झाली होती.

    बारामती : पतीच्या वैद्यकीय खर्चासाठी मॅरेथॉन अनवाणी पायाने धावत विजेतेपद जिंकणा-या लता भगवान करे यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित “लता भगवान करे : एक संघर्षगाथा “या चित्रपटास राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

    मूळच्या बुलडाणा जिल्ह्यातील असलेल्या लता करे या बारामती परीसरात पती व मुलासह वाआहेत .मोलमजुरी करुन त्यांनी आपल्या तीन मुलींची लग्ने करून दिली आहेत. रोजंदारीसाठी बारामतीत आल्यानंतर त्या याठिकाणी स्थायिक झाल्या आहेत. लताबाईंचे पती ह्दयविकाराने त्रस्त होते, त्यांच्या उपचारासाठी लताबाईंकडे पैसे नव्हते. त्यामुळे बारामती शहरात आयोजित करण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेत त्या सहभागी झाल्या होत्या,अनवाणी पायाने धावत ६६ वर्षीय लताबाई विजेत्या ठरल्या होत्या. त्यांच्या या कामगिरीची चर्चा देशभर झाली होती. या पार्श्वभूमीवर चित्रपट दिग्दर्शक नवीन देशबोनाई यांनी लताबाई करे यांच्या वास्तव जीवनावर आधारीत चित्रपट प्रदर्शित यामध्ये लताबाई करे यांची प्रमुख भूमिका आहे ,त्यांचे पती भगवान करे व मुलगा सुनिल करे यांनीही भूमीका साकारल्या आहेत. तसेच रेखा गायकवाड, राधा चव्हाण, अजय शिंदे व बालकलाकार साक्षी यांच्यादेखील भूमीका आहेत. या चित्रपटाला प्रशांत महामुनी यांचे संगीत असून पार्श्वसंगीत कन्नू समीर यांनी दिले आहे.