कुणी काही ही केले तरी महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करेल आणि, पुन्हा सत्तेत येणार ; राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा विश्वास

आज पिंपरी- चिंचवडमध्ये राष्ट्रवादी चे आमदार अण्णा बनसोडे यांच्या विविध शासकीय योजनांची माहिती व मदत मध्यवर्ती केंद्र चे उदघाटन केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे. सीबीआय, ईडी, आयकर विभागाचा गैरवापर होत आहे. जे सरकार केंद्र सरकारच्‍या विचारांचे नाही, त्‍या सरकारला या यंत्रणेच्‍या वापर महाराष्‍ट्र, तामिळनाडू, प. बंगालमधील सरकार अस्‍थिर करण्‍यासाठी होत आहे. लोकप्रतिनिधी दडपणाखाली ठेवण्‍यासाठी काम सुरु आहे, असा आरोपही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

  पिंपरी- तुम्‍ही काहीही करा, हे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल आणि आघाडीचे सरकार जनतेचा विश्वास जिंकून राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचचं सरकार येणार, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी कांग्रेस चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज पिंपरी चिंचवड़ येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, काहींनी ‘मी पुन्‍हा येणार’, अशा घोषणा दिल्‍या. मात्र त्‍यांचे स्‍वप्‍न पूर्ण झाले नाही. आता राज्‍यातील सरकार स्‍थिर आहे. त्‍यामुळे तपास यंत्रणांचा गैरवापर करत सरकार अस्‍थिर करण्‍याचा प्रयत्‍न सुरु आहे. तुम्‍ही दवाबतंत्राचा वापर करा, छापे टाका. तुम्‍ही काहीही करु शकता. तरीही आघाडी सरकार आपलाकार्यकाळ पूर्ण करेलच, असा विश्‍वासही शरद पवार यांनी व्‍यक्‍त केला.

  आज पिंपरी- चिंचवडमध्ये राष्ट्रवादी चे आमदार अण्णा बनसोडे यांच्या विविध शासकीय योजनांची माहिती व मदत मध्यवर्ती केंद्र चे उदघाटन केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केंद्रावर सडकून टीका केली आहे. सीबीआय, ईडी, आयकर विभागाचा गैरवापर होत आहे. जे सरकार केंद्र सरकारच्‍या विचारांचे नाही, त्‍या सरकारला या यंत्रणेच्‍या वापर महाराष्‍ट्र, तामिळनाडू, प. बंगालमधील सरकार अस्‍थिर करण्‍यासाठी होत आहे. लोकप्रतिनिधी दडपणाखाली ठेवण्‍यासाठी काम सुरु आहे, असा आरोपही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

  छापा टाकला की पाच दिवस पाहुणचार घेतला, अजित पवारांच्‍या तीन बहिणीच्‍या मालमतेवर छापा टाकण्‍यात आले. छापा टाकणारे घरात एक ते दोन दिवस राहिले ठीक आहे. पण पाच दिवस १५ माणसांनी छापा टाकला. त्‍यांचे वागणे बरोबर होते. तुम्‍हीच तिथेच थांबवले, असा आदेश त्‍यांना फोनवरुन येत होतो. एखाद्‍याच्‍या घरी १५ माणसं पाठवणे योग्‍य आहे का, चौकशी करण्‍याचा अधिकार आहे. काम संपल्‍यानंतर किती दिवस पाहुचार किती दिवस करणार, वरुन आदेश असल्‍यामुळे ही मंडळी पाच दिवस बसून होता, असेही पवार यावेळी म्‍हणाले.

  राज्यात सरकार तयार होताना मुख्यमंत्री शिवसेनाचा होईल हे सर्वांनी एकमताने मान्य केल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले. केंद्र सरकारला सर्वसामान्य जनतेविषयी कोणतीही आस्था नाही. केंद्र सरकार सामान्य जनतेला महागाईच्या दरीत ढकलत आहे. गेल्या काही काळापासून दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. राज्यसरकारने केंद्राला कोळश्याचे तीन हजार कोटी दिले नाहीत म्हणून केंद्राने राज्याचा कोळश्याचा पुरवठा थांबवला, पण केंद्राकडून राज्याला ३५ हजार कोटी जीएसटी’चे येणं बाकी आहे. मात्र केंद्र हे राज्य सरकारवरच आरोप करत आहेत. अशा शब्दात पवार यांनी केंद्रावर निशाणा साधला.

  यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. सीबीआयला कारवाई करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. मात्र मात्र केंद्र सरकार सत्तेचा गैरवापर करुन तपास यंत्रणांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. सत्तेचा गैरवापर करुन सीबीआय, ईडी, आयकर, नार्कोटिक्स कंट्रोल यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर केला जात आहे. त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टिकेला उत्तरही दिले. आघाडी सरकार स्थापन करण्यात माझाही सहभाग होता.

  आघाडी सरकार स्थापन करताना सगळ्या आमदरांच्या बैठकीत नेतृत्त्व कोणी करावे यासाठी तीन नावे समोर होती. उद्धव ठाकरे नेतृत्त्व करण्यासाठी तयार नव्हते. पण मी त्यांचा हात वर केला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याशी माझा व्यक्तिगत सलोखा होता. बाळासाहेबांशी असलेल्या सलोख्यामुळे त्याच्या चिरंजिवाला संधी मिळावी हा माझा आग्रह होता. त्यामुळे मी पुन्हा येणार असे म्हणणारे देवेंद्र फडणीवसांनी अशा कोणत्याही गोष्टीवर आक्षेप घेऊ नये.

  मी पुन्हा येणार म्हणणारे देवेद्र फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ आहेत. त्यामुळे ते फडणवीस त्यांच सरकार गेल्यापासून अस्वस्थ आहेत. सरकार अस्थिर करण्यासाठी तपाास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे, तर केंद्रसरकारही राज्यावर दोषारोप करण्यात व्यस्त आहे. पण हे सरकार कधीही हरणार नाही, केंद्राने कितीही छापे मारावेत. असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला आहे. तसेच, अजितपवारांना मुख्यमंत्री करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही. शेवटपर्यंत महाविकास आघाडीचे नेतृत्त्व शिवसेनेकडेच राहणार, असे म्हणत त्यांनी आघाडीचे सरकार जनतेचा विश्वास जिंकून राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचचं सरकार येणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.