नवनीत राणांचं संसदेतील भाषण हे एक अभिनयाचा उत्तम नमुना होता; रुपाली चाकणकरांची टीका

काल लोकसभेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी, मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली होती. काल संसदेत केलेलं भाषण हे एक अभिनयाचा उत्तम नमुना होता आणि तो तुम्ही करता, मात्र तुम्हाला जर एवढा पुळका असेल तर आधी राजीनामा द्यावा नंतर राष्ट्रपती राजवटीची मागणी करा, अशी टीकाही चाकणकर यांनी केली.

    पुणे : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक आरोप – प्रत्यारोप केले जात आहेत. विरोधकांकडून राज्यात रा।ष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात आहे. याचं पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांनी राज्यसभेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. यावरुन आता राष्ट्रीवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी राणा यांना टोला लगावला आहे.

    दरम्यान काल लोकसभेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी, मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली होती. काल संसदेत केलेलं भाषण हे एक अभिनयाचा उत्तम नमुना होता आणि तो तुम्ही करता, मात्र तुम्हाला जर एवढा पुळका असेल तर आधी राजीनामा द्यावा नंतर राष्ट्रपती राजवटीची मागणी करा, अशी टीकाही चाकणकर यांनी केली.

    त्यावर नवनीत राणा म्हणाल्या की, मी राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आली नाही, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेबांनी मला समर्थन दिले त्याचा मी आदर करते. पण रुपाली चाकणकर यांनी मला सांगू नये कुणी राजीनामा द्यावा ते, अशा शब्दात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी चाकणकरांना प्रत्युत्तर दिले.