विषय समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-काँग्रेसची सरशी

णीपुरवठा, बांधकाम व महिला, बालकल्याण या तीन समित्या बिनविरोध झाल्या. क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे राहुल ढोरे व भाजपाचे दशरथ केंगले यांनी अर्ज दाखल केले होते, ढोरे यांना तीन तर केंगले यांना दोन मते मिळाल्याने सभापती पदी राहुल ढोरे यांची निवड झाली.

: वडगाव नगरपंचायतीच्या विषय समित्यांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कांग्रेसने तीन समित्यांवर बिनविरोध तर तीन समित्यांवर प्रत्येकी एका मताने
विजय मिळवून बाजी मारली आहे. यामध्ये पाणीपुरवठा समितीच्या सभापतिपदी उपाध्यक्ष हे पदसिद्ध सभापती असतात, त्यामुळे उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सभापतिपदी बिनविरोध निवड झाली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतिपदासाठी पूजा विशाल वहिले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी पूनम खंडेराव जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. दरम्यान या समितीला उपसभापती पद असते, परंतु उपसभापतिपदासाठी एकही अर्ज न आल्याने ते पद रिक्त राहिले. याप्रमाणे पाणीपुरवठा, बांधकाम व महिला, बालकल्याण या तीन समित्या बिनविरोध झाल्या. क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे राहुल ढोरे व भाजपाचे दशरथ केंगले यांनी अर्ज दाखल केले होते, ढोरे यांना तीन तर केंगले यांना दोन मते मिळाल्याने सभापती पदी राहुल ढोरे यांची निवड झाली. नियोजन व विकास समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादीचे राजेंद्र कुडे व भाजपाचे किरण म्हाळसकर यांनी अर्ज दाखल केले होते, कुडे यांना तीन तर म्हाळसकर यांना दोन मते मिळाल्याने सभापती पदी राजेंद्र कुडे यांची निवड झाली.

स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या माया अमर चव्हाण व भाजपाचे प्रवीण चव्हाण यांचे अर्ज दाखल झाले होते, माया चव्हाण यांना तीन तर प्रवीण चव्हाण यांना दोन मते मिळाल्याने सभापती पदी माया चव्हाण यांची निवड झाली. याप्रमाणे ह्या तीन समित्यांच्या हात उंचावून झालेल्या निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बाजी मारली.

स्थायी समितीच्या सभापतिपदी पदसिद्ध सभापती म्हणून नगराध्यक्ष मयुर ढोरे यांची तर पदसिद्ध सदस्य म्हणून सर्व समित्यांचे सभापती यांची निवड झाली. पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगराध्यक्ष मयुर ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, गटनेते राजेंद्र कुडे, प्रमिला बाफना, दिनेश ढोरे यांच्या उपस्थितीत आज झालेल्या विशेष सभेत नगरपंचायतच्या विविध विषय समित्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडली.

समितिनिहाय सभापती व सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे :

स्थायी समिती : मयुर ढोरे(सभापती), चंद्रजीत वाघमारे, राजेंद्र कुडे, राहुल ढोरे, माया चव्हाण, पूजा वहिले, पूनम जाधव (सदस्य)
पाणीपुरवठा समिती : चंद्रजीत वाघमारे (सभापती), शारदा ढोरे, प्रमिला बाफना, दीपाली मोरे, दिनेश ढोरे (सदस्य)
सार्वजनिक बांधकाम समिती : पूजा वहिले (सभापती), प्रमिला बाफना, सायली म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर, सुनीता भिलारे (सदस्य)
महिला व बालकल्याण समिती : पूनम जाधव (सभापती), प्रमिला बाफना, सायली म्हाळसकर, अर्चना म्हाळसकर, दीपाली मोरे (सदस्य)
क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक समिती : राहुल ढोरे (सभापती), सायली म्हाळसकर, शारदा ढोरे, दिलीप म्हाळसकर, दशरथ केंगले (सदस्य),                               नियोजन व विकास समिती : राजेंद्र कुडे (सभापती), प्रमिला बाफना, सायली म्हाळसकर, किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे (सदस्य) स्वच्छता वैद्यक व सार्वजनिक आरोग्य समिती : माया चव्हाण (सभापती), प्रमिला बाफना, शारदा ढोरे, अर्चना म्हाळसकर, प्रवीण चव्हाण (सदस्य