राष्ट्रवादी काँग्रेसची स्वराज्य ध्वज यात्रा आज पुण्यात दाखल

देशातील सर्वात उंच स्वराज्यध्वज उभा राहणाऱ्या स्वराज्य ध्वज यात्रा आज धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या समाधी स्थळ वढू बुद्रुक येथे दाखल झाली आहे. एकूण ७२ प्रार्थनास्थळांवर स्वराज ध्वजाचे पूजन करण्यात येणार असून हा ध्वज ७२ मीटर रुंदीचा उंच आहे.

    पुणे : देशातील सर्वात उंच स्वराज्यध्वज उभा राहणाऱ्या स्वराज्य ध्वज यात्रा आज धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांच्या समाधी स्थळ वढू बुद्रुक येथे दाखल झाली आहे. एकूण ७२ प्रार्थनास्थळांवर स्वराज ध्वजाचे पूजन करण्यात येणार असून हा ध्वज ७२ मीटर रुंदीचा उंच आहे.

    स्वराज्य ध्वजाच्या या प्रवास मोहिमेला समाजातील सर्वच स्तरांमधून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांतून तिथल्या प्रेरणास्थळांना अभिवादन करत यशस्वीरीत्या वाटचाल करणारी राष्ट्रवादी काँग्रेसची स्वराज्य ध्वज यात्रा आज प्रवासाच्या शेवटच्या आठवड्यात पुणे जिल्ह्यात पोहोचली आहे.

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षेपी व आदर्श स्वराज्याची आठवण करून देण्यासाठी ही नावीन्यपूर्ण कल्पना राज्यात यशस्वीरीत्या राबवल्याबद्दल राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांचीही प्रशंसा होत आहे.