पुण्यात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले

गेल्या पंधरा दिवसापासून शहरातील काेराेनाबाधित नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या आठवड्यापर्यंत शंभरच्या आसपास आढळून येण्याचे प्रमाण एकदम वाढून दाेनशेच्या पुढे गेले आहे. यामुळे नागरीकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे अाहे. गेल्या काही दिवसांत संशयित रुग्णांच्या चाचण्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या चाेवीस तासांत ६ हजार ६०० जणांची चाचणी केली गेली. यात २३२ जण काेराेना बाधित आढळून आले.

    पुणे : शहरात काेराेेनाचे नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या चाेवीस तासांत २३२ नवीन रुग्ण आढळून आले आहे. यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.

    गेल्या पंधरा दिवसापासून शहरातील काेराेनाबाधित नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या आठवड्यापर्यंत शंभरच्या आसपास आढळून येण्याचे प्रमाण एकदम वाढून दाेनशेच्या पुढे गेले आहे. यामुळे नागरीकांनी अधिक सतर्कता बाळगणे गरजेचे अाहे. गेल्या काही दिवसांत संशयित रुग्णांच्या चाचण्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या चाेवीस तासांत ६ हजार ६०० जणांची चाचणी केली गेली. यात २३२ जण काेराेना बाधित आढळून आले. ८३ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या शहरात १ हजार २१८ सक्रीय रुग्ण असुन, त्यापैकी ९० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. गेल्या चाेवीस तासांत शहरातील एका काेराेनाबाधित रुग्णाच्या मृत्युची नाेंद झाली नाही. तर शहराबाहेरील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत शहरात एकूण ५ लाख ९ हजार ५०८ जणांना काेराेनाची लागण झाली हाेती, त्यापैकी ४ लाख ९९ हजार १७५ जणांनी काेराेनावर मात केली आहे. तर ९ हजार ११५ जणांचा मृत्यू झाला आहे.